पैशांसाठी काहीपण...! का मागतेय सारा लोकांकडे पैस; धक्कादायक व्हिडिओ समोर

सारा अली खानचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती लोकांकडे पैसे मागताना दिसत आहे.

Updated: May 8, 2022, 06:32 PM IST
पैशांसाठी काहीपण...! का मागतेय सारा लोकांकडे पैस; धक्कादायक व्हिडिओ समोर title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपला ठसा उमटवणाऱ्या सारा अली खानने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यामध्ये ती लोकांकडे पैसे मागताना दिसत आहे. तिने काही रुपयांसाठी अज्ञात व्यक्तीच्या दुचाकीवर बसण्यासही होकार दिला. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पैसे मागत सारा रस्त्यावर आली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सारा अली खान पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर गाणं गुणगुणताना दिसत आहे. पैशासाठी तिने लोकांना ऑटोग्राफही दिला. सेल्फी काढण्याच्या बदल्यात तिने लोकांकडे पैशांची मागणी केली आणि अज्ञात व्यक्तीच्या दुचाकीवर बसून राऊंन्डही मारला. मात्र, सारा हे सगळं तिच्या इच्छेने नाही तर शोच्या मागणीमुळे करत होती. तिला एक टास्क पूर्ण करायचा होता, जो तिला फराह खानकडून 'द खतरा खतरा' या कॉमेडी शोमध्ये मिळाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिठाईचा बॉक्स घेऊन शोमध्ये पोहचली
फराह खानच्या सांगण्यावरून सारा अली खान बाहेर पडली. यानंतर साराने जे केलं ते पाहून आजूबाजूचे लोक दंग झाले. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री भारती सिंहदेखील सारासोबत रस्त्यावर उतरली आहे. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, सारा रस्त्यावर गाणे गाताना दिसत आहे याचबरोबर सारा सेल्फी देखील काढते. मात्र साराने तिचे सगळे टास्क पूर्ण केले. मग त्याच पैशातून हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगचे आई-वडील झाल्याच्या आनंदात मिठाईचा बॉक्स घेऊन ती पुन्हा 'द खतरा शो'मध्येही पोहोचली.