Sarabhai vs Sarabhai फेम अभिनेत्रीच्या करिअरसाठी पतीचा मोठा त्याग

असा पती प्रत्येक मुलीच्या नशीबात हवा... अभिनेत्रीसाठी पतीने जे केलं ते सहजा-सहजी कोणीही करणार नाही   

Updated: Nov 19, 2022, 01:57 PM IST
Sarabhai vs Sarabhai फेम अभिनेत्रीच्या करिअरसाठी पतीचा मोठा त्याग title=

Sarabhai vs Sarabhai : सध्या अनुपमा (Anupamaa) मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात असलेली अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) ने तिच्या खासगी आयुष्यातील फार मोठ्या गोष्टीबद्दल चाहत्यांना मोकळेपणाने सांगितलं आहे. आज रुपाली यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना संपूर्ण टीमला स्वतःच्या विजयाचं श्रेय देते. पण पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा पडद्यामागे राहून भूमिका बजावणाऱ्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.. हे देखील तितकच खरं आहे. 

रुपालीच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे, जिने रुपाली स्वप्नांसाठी मोठा त्याग केला. रुपालीच्या आयुष्यातील ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्रीचा पती अश्विन के वर्मा (rupali ganguly husband) आहे. अश्विन यांनी रुपालीला करियरमध्ये पुढे जाता यावं म्हणून निवृत्ती घेतली आहे. (rupali ganguly daughter)

रुपाली म्हणजे, 'माझे कायम मला पाठिंबा देतात. आपल्या मुलाला आई किंवा वडिलांची गरज आहे... असं ते कायम म्हणतात. म्हणून अश्विन अमेरिकेतून परत मायदेशी आले आहेत. मी माझ्या मुलाला मदतनीसांकडे सोडत नाही. असं नाही मदतनीस चांगल्या नसतात माझ्या घरात एक मुलगी आहे. जी माझ्या मुलाची काळजी घेते. ती आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे...' (rupali ganguly net worth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rups (@rupaliganguly)

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'माझे पती रुद्रांशसाठी घरीच असतात. मी जेव्हा घरी नसते तेव्हा अश्विन मुलाची पूर्ण काळजी घेतात. एक आई म्हणून मी अपयशी आहे, पण अश्विन माझ्या मुलासाठी आई-वडील दोन्ही आहे...' (rupali ganguly age)

रुपालीचं करियर

वयाच्या 7 व्या वर्षी रुपाली गांगुलीने साहेब चित्रपटातून (rupali ganguly family) बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर रुपाली तिच्या वडिलांच्या बच्चन या चित्रपटात दिसली. रुपालीने 2000 मध्ये सुकन्या सिनेमाद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. (rupali ganguly family)