Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट

Satish Kaushik यांचे 8 मार्च रोजी हृदयविकारानं निधन झाल्याचे म्हटले जाते. त्यांचे दिल्लीत शवविच्छेदन देखील करण्यात आले. मात्र, नक्की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला यावर दिल्ली पोलिसांना संशय आहे. यामुळे त्यांनी त्यांची तपासणी सुरु ठेवली आहे. यासोबतच पुढील तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला आहे. 

Updated: Mar 10, 2023, 11:38 AM IST
Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट title=

Satish Kaushik Daughter Post : बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) आज आपल्यासोबत नाहीत. सतीश यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काल 9 मार्च रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर तर सगळ्यांना मोठा धक्काच बसला होता. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या मुलीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  

सतीश कौशिक यांची लेक वंशिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. वंशिकानं सतीश यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत वंशिका सतीश यांना मिठी मारताना दिसत आहे. या फोटोत त्या दोघं एकमेकांची कंपनी किती एन्जॉय करतात हे पाहायला मिळत आहे. वंशिकानं हा फोटो शेअर करत हार्ट इमोटिकॉन वापरले आहे. वंशिका ही फक्त 11 वर्षांची आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला स्ट्रॉंग राहण्यास सांगितले. तुझ्या दु: खात आम्ही साथ आहोत असं अनेकांनी कमेंट करत म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सतीश कौशिक आणि वंशिका हे खूप क्लोज होते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचे. त्या दोघांचे फनी व्हिडीओ पाहने नेटकऱ्यांना प्रचंड आवडायचे. वंशिका देखील मल्टीटॅलेंटेड आहे. सतीश यांना त्यांच्या मुलीला मोठं होताना पाहायचं होतं मात्र, ते स्वप्न अर्धवटचं राहिलं. 

सतीश कौशिक यांची लेक वंशिकाचा जन्म कधी झाला? 

खरंतर वंशिकाआधी सतीश कौशिक यांचा एक मुलगा होता. त्यांचा मुलगा 2 वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. मुलाच्या निधनानं सतीश कौशिक यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर जवळपास 16 वर्षांनंतर वंशिकाचा जन्म झाला. सरोगसिच्या माध्यमातून वंशिकाचा जन्म झाला होता. वंशिकाचा जन्म झाला तेव्हा सतीश कौशिक हे 56 वर्षांचे होते. 

हेही वाचा : मला हिंदी समजत नाही, चल जा; भाषेवरुन सुरु झालेल्या वादावर Prakash Raj यांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणात झाला होता. सतीश कौशिक यांनी आजवर 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. सतीश कौशिक यांना आजही लोक 'मिस्टर इंडिया' या चित्रपटातील कॅलेंडर या भूमिकेसाठी ओळखतात.