Gautam Patil viral Video: 'हाय झुमका वाली पोरं' गाण्यावर गौतमी पाटीलचा किलर डान्स!

Gautami Patil Dance Video: सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचा नावाचा दबदबा आहे. तिचे डान्स व्हिडीओज (Dance Videos) हे तूफान व्हायरल होतात. महाराष्ट्रभर होणाऱ्या तिच्या कार्यक्रमांनाही लोकांची तूफान गर्दी उसळते, तिचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Gautami Patil Songs) गाजतो आहे. 

Updated: Mar 10, 2023, 08:10 PM IST
Gautam Patil viral Video: 'हाय झुमका वाली पोरं' गाण्यावर गौतमी पाटीलचा किलर डान्स! title=
gautami patil viral video a new dance video of gautami patil goes viral on social media netizens reacts

Gautami Patil Viral Video: सध्या महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती म्हणजे गौतमी पाटीलची (Gautami Patil). आपल्याला हटके डान्समुळे तिची कायमच चर्चा होत राहते. सोशल मीडियावर तिच्या डान्स व्हिडीओ हे अनेकदा व्हायरल होत असतात. त्यामुळे तिची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत असते. सध्या तिचा असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Gautami Patil Viral Videos) व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये ती एका कार्यक्रमात 'हाय झुमका वाली पोरं' (Gautami Patil Trending Videos) या गाण्यावर तूफान डान्स करताना दिसते आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी सकारात्मक प्रतिक्रिया देत तिच्या नृत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला नकारात्मक प्रतिसाद देत तिला ट्रोलही केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्ता रंगलेली पाहायला मिळते आहे. (gautami patil viral video a new dance video of gautami patil goes viral on social media netizens reacts)

या व्हिडीओत ती लावणीच्या वेशभुषेत दिसते आहे. पांढऱ्या रंगाच्या (Gautami Patil Saree) आणि सोनेरी काठपदराच्या साडीवर तिनं गडद मरून रंगांचा ब्लाऊज घातला आहे. त्यावर अनेक दागिने परिधान केले असून पायात घुंगरे घातले आहेत. त्यामुळे सध्या तिच्या या लुकचीही चर्चा होते आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, गौतमी बेधुंदपणे नाच करताना दिसते आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला (Gautami Patil Shows) सगळीकडेच तुफान गर्दी असते. महाराष्ट्राभर गौतमीचे कार्यक्रम रंगत असतात आणि तिचे व्हिडीओ मग सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. 

गौतमी पाटील आणि वाद 

लावणीच्या नावाखाली गौतमी पाटील अश्लील हावभाव करते असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात तिच्या लावणी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी कडाडून टीकाही केली होती. त्यातून तिनंही आपले असे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावरही व्हायरल केले होते. मध्यंतरी तिच्या अशा डान्स व्हिडीओजमुळे (Gautami Patil Controversy) वातावरण पटले होते. लावणीसारख्या पारंपारिक आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या या नृत्यपरंपरेच्या नावाखाली गौतमी पाटील अत्यंत लज्जास्पद नृत्य करते अशी टीका तिच्यावर करण्यात आली. याप्रकरणात पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रूपाली ठोंबरे आणि अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे यांनी तिची भेटही घेतली होती. ज्याचा व्हिडीओही त्यांनी युट्यूबवर अपलोड केला होता. यात गौतमीनं स्वत:हून माफीही मागितली होती. व यापुढे आपल्याकडून कुठल्याही प्रकारे चुकीच्या पद्धतीनं नृत्यं केले जाणार नाही याबद्दलही तिनं सांगितले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अधिवेशनातही गौतमीचा मुद्दा उमटला!

गौतमी पाटील हिचा मुद्दा अधिवेशनातही मांडण्यात आला होता. राज्यात लावणीच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू आहेत जे बंद होणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांना सेन्सॉर लागले पाहिजे अशी मागणी भाजप नेत्या उमा खापरे यांनी केली होती.