ठाणे : संकल्प इंग्लिश स्कूल नेहमीच वेगवेगळे उपक्रम करत असते. पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमाबाहेर जाऊन विद्यार्थांचा सर्वांगीण विकास कसा होईल गोष्टीवर नेहमीच भर दिला जातो. असाच एक अभिनव उपक्रम सध्या ही शाळा राबवत आहे. शाळेतील मुलांना व शिक्षकांना घेऊन. शालेय जीवनाचा आपल्यावर किती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो हे दाखवणारा एक लघुपट तयार केला आहे.
या लघुपटातील सर्वच पत्र हे शाळेतील आहेत. शंकर (राज) परब यांची निर्मिती असणाऱ्या या लघुपटची कथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती परब यांनी केली आहे. तर दिग्दर्शन अजय पाटील यांनी केले आहे. तर लघुपटातील सर्व गीते अरुण म्हात्रे यांनी लिहलेली आहेत. कथेचे कथानक शाळेतील एक गरीब मुलगा व त्याची शिक्षिका यांच्या भोवती फिरते आहे.
दैनंदिन जीवनामध्ये शिक्षकांकडूनही छोट्या मोठ्या चुका होत असतात जर त्या वेळेवर कळल्या व त्या सुधारल्या गेल्या तर विद्यार्थांच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो.
संकल्प इंग्लिश स्कूलची स्थापना १९९९ साली झाली. शाळेमध्ये अनेक उपक्रमाद्र्वारे विद्यार्थांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. मास्टर शेफ ही स्पर्धा घेऊन स्वयंपाक कसा करायचा करायचा व त्यायोगे स्वच्छतेचे महत्व शिकवले जाते. या चिमणी दिवसाला विद्यार्थांनी चिमण्यांसाठी घरटी तयार केली होती. भूतदया या शब्दाची ओळख विद्यार्थांना अशी करून देण्यात आली.