‘स्कूबी डू’चे निर्माते केन स्पीअर्स यांचं निधन

१९६९ साली केन स्पिअर्स यांनी कार्टूनची निर्मिती केली होती.  

Updated: Nov 10, 2020, 04:35 PM IST
‘स्कूबी डू’चे निर्माते केन स्पीअर्स यांचं निधन  title=

मुंबई : नव्वदच्या दशकातील लहानांसोबतचं मोठ्यांच्यापण मनात घर केलेल्या ‘स्कूबी डू’कार्टूनचे निर्माते केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. त्यामुळे कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे. २०२० साली अनेक दिग्गज मंडळी आणि कलाकारांनी कोरोना किंवा अन्य कारणांमुळे या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यापैकी एक म्हणजे  ‘स्कूबी डू’चे निर्माते केन स्पीअर्स. ते ८२ वर्षांचे होते. गेली काही वर्ष ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. 

त्यामुळे अमेरिकेच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केन यांचा मुलगा केव्हीनने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. चाहत्यांनी सोशल मीडियावरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केन यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे.

१९६९ साली केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीने या कार्टूनची निर्मिती केली होती.  स्कूबी डू सोबतच त्यांनी ‘पॉपाय द सेलर मॅन’, ‘टॉम अँड जेरी’, जॉनी ब्राव्हो यांसारख्या अनेक कल्ट क्लासिक कार्टूनसाठी क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे