अखेर ड्रीम गर्लला अनेक वर्षांनंतर 'तो' फोटो मिळाला

जीवनात अशा अनेक गोष्टी असतात त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो.     

Updated: Nov 10, 2020, 04:11 PM IST
अखेर ड्रीम गर्लला अनेक वर्षांनंतर 'तो' फोटो मिळाला title=

मुंबई : जीवनात अशा अनेक गोष्टी असतात त्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. त्यापैकी काही गोष्टी आपल्याला लगेच मिळतात, तर काही गोष्टी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न आणि प्रतिक्षा करावी लागते. मात्र इच्छा असेल तर ती गोष्ट आपल्याला आयुष्याच्या एका टप्प्यावर मिळते. असचं काहीसं झालंय बॉलिवूडची ड्रीम गर्ल अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत. कित्येक वर्षांपासून त्यांचा एक जुना फोटो हरवला होता. अनेक वर्षांपासून त्या जुन्या फोटोच्या शोधात होत्या.  मात्र त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. 

फोटो मिळाल्याचा आनंद त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या एका देवीच्या भूमिकेत दिसत आहेत. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शन देखील दिलं आहे. 

देवीच्या भूमिकेतील फोटो शेअर करत त्या म्हणाल्या, 'मी कित्येक वर्षांपासून एक फोटो शोधत आहे. हे फोटोशूट मी एका तामीळ मॅगझीनसाठी केलं होतं. AVM स्टुडिओमध्ये याचं शूट झालं होतं. मला सध्या त्या मॅगझीनचं नाव आठवत नाही.' असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

सागायचं झालं तर १९६८ साली 'सपनों का सौदागर' या चित्रपटाच्या माध्यमातून हेमा मालिनी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटापूर्वी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं. तेव्हा त्यांचं वय फक्त १५ वर्ष होतं. 'सपनों का सौदागर' चित्रपटानंतर त्यांनी अनेक स्वप्न पूर्ण झाली. 

'सपनों का सौदागर' चित्रपटानंतर त्यांनी 'जॉनी मेरा नाम', 'सीता और गीता', 'ड्रीम गर्ल', 'शोले' आणि 'बागबान' अशा अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.