दुसऱ्या दिवशी 'बाला'ची विक्रमी कमाई

'बाला' चित्रपट सध्या चढत्या क्रमावर आहे. 

Updated: Nov 10, 2019, 01:55 PM IST
दुसऱ्या दिवशी 'बाला'ची विक्रमी कमाई

मुंबई : अभिनेता अयुषमान खुराणा स्टारर 'बाला' चित्रपट सध्या चढत्या क्रमावर आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने १० कोटींचा आकडा पार केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या आयुषमानच्या 'ड्रीमगर्ल' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. आता आयुषमानचा 'बाला' चित्रपट देखील चाहत्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. 

'बाला' चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी तब्बल २५ कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. 

८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेला 'बाला' चित्रपटाची कथा अकाली टक्कल पडलेल्या एका तरूणावर आधारित आहे. या तरूणाची भूमिका चित्रपटात आयुषमान बजावत आहे. तर आता येत्या काळात हा चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.