कोण आहे आर्यन खानची मैत्रिण, जिला गौरी खाननं दिलं इतकं महागडं गिफ्ट?

अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Updated: Jan 14, 2022, 01:37 PM IST
 कोण आहे आर्यन खानची मैत्रिण, जिला गौरी खाननं दिलं इतकं महागडं गिफ्ट?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे. जिने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. अनन्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अभिनयासोबतच अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

सोशल प्लॅटफॉर्मवर ती चाहत्यांसह तिचे नवीनतम अपडेट्स शेअर करत असते. दरम्यान, अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एका खास गिफ्टचा फोटो शेअर केला आहे. हे गिफ्ट तिला खान कुटुंबाकडून मिळाले आहे. ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अन्यया पांडेचं शाहरुख खानच्या कुटुंबासोबत चांगलं नातं आहे. अनन्या आणि सुहाना खान चांगल्या मैत्रिणी आहेत. आर्यनसोबत देखील अनन्या अनेकदा पार्ट्यांमध्ये दिसली आहे.आता अनन्याला हे खास गिफ्ट दुसरे कोणी दिले नसून शाहरुख खानची पत्नी गौरी खानने दिले आहे. 

Ananya Panday-Aryan Khan's Party Pics: All The Times When SRK's Son Partied  With Other Star Kids

शाहरुख खानची पत्नी गौरी खानने अलीकडेच अनन्या पांडेला एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. गौरीने अनन्याला एक अतिशय सुंदर पोर्ट्रेट भेट म्हणून दिले आहे.

हे पोर्ट्रेट खास आहे कारण ते अनन्याचं चित्र आहे. अनेक आधुनिक गोष्टींचे मिश्रण करून हे पोर्ट्रेट बनवण्यात आले आहे.

Pin on Aryan Khan

गौरीकडून इतकं सुंदर गिफ्ट मिळाल्याने अनन्याला खूप आनंद झाला असून तिने एका खास नोटद्वारे गौरीचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.