FILM RIVIEW : प्रेमात उद्ध्वस्त झालेल्या 'कबीर सिंह'ची कहाणी

एका वळणावर दोघांनाही वेगळं व्हाव लागतं आणि...

Updated: Jun 21, 2019, 01:51 PM IST
FILM RIVIEW : प्रेमात उद्ध्वस्त झालेल्या 'कबीर सिंह'ची कहाणी  title=

दिग्दर्शक : संदीप रेड्डी वांगा
कलाकार : शाहिद कपूर, कियारा आडवाणी, अर्जन बाजवा, कामिनी कौशल, सुरेश ओबेरॉय

'कबीर...' अतिशय प्रेम करणारा, प्रेमात कुर्बान होणारा... आणि प्रेमातच स्वत:ला बर्बाद करणाऱ्या एका वेड्या प्रेमाची कहाणी 'कबीर सिंह'मधून मांडण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची मोठी चर्चा होती. चित्रपटात एका अशा प्रेमाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, जे प्रेम एका व्यक्तीला ड्रॅग्जच्या आहारी...थेट बर्बादीकडेच नेऊन पोहचवते. 

'कबीर सिंह'मधून शाहिद आणि कियारा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत प्रेमावर आधारित अनेक चित्रपट आले. विविध प्रकारे प्रेमाची अनेक रुपं आपण बॉलिवूड चित्रपटात पाहिली. परंतु 'कबीर सिंह' या सगळ्या चित्रपटांपासून काहीसा हटके ठरला असल्याचं म्हणायला हरकत नाही. 'कबीर सिंह' हा साऊथच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

Video: रिलीज होते ही यूट्यूब पर ब्लॉकबस्टर बना 'कबीर सिंह' का सॉन्ग, मिल रहे हैं धुआंधार व्यूज

प्रिती...फर्स्ट ईयर कॉलेज स्टुडंट...पहिल्याच नजरेत कबीरला प्रितिशी...तिच्या साधेपणाशी प्रेम होतं...सगळं काही सुरळित सुरु असताना अचानक एका वळणावर दोघांना वेगळं व्हाव लागतं आणि मग सुरु होते कबीरची बर्बादीकडे जाणारी कहाणी. 

Video: शाहिद का रोमांटिक अंदाज हुआ वायरल, रिलीज हुआ 'कबीर सिंह' का 'मेरे सोनेया'

संदीप रेड्डी वांगा यांनी अतिशय चित्रपटाची कथा अतिशय सुंदररित्या मांडली आहे. शाहिदने साकारलेल्या 'कबीर'ला त्याने पुरेपुरे दाद दिली आहे. 'कबीर'चा राग, प्रेम, पागलपन, जिद्द, नशेच्या आहारी गेलेला अशा सर्वच भावना त्याने पडद्यावर तंतोतंत उतरवल्या आहेत. प्रेमात वेडा झालेला, आपल्या प्रेमासाठी वाट्टेल ते करणारा, प्रेमातच स्वत:ला बर्बाद करणारा 'आशिक' शाहिदने जबरदस्त साकारला आहे. शाहिदच्या तुलनेत कियारा आडवाणी अर्थात 'प्रिती' काहीशी फिकी वाटते. मात्र प्रितिच्या साधेपणाने आणि पुढे हळू हळू ती उलगडत गेल्याने तीही विशेष लक्ष वेधते. 

कबीरच्या वडिलांची भूमिका साकारणारे सुरेश ओबेरॉय, कॉलेजच्या डीनची भूमिका साकारणारे आदिल हुसैन आणि बाकी इतर कलाकारांनीही चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. कबीरसोबत शिकण्यापासून ते कबीरचं आयुष्य वाचवण्यापर्यंत, त्याला सावरणाऱ्या, कबीरच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता सोहम मजूमदार चित्रपटात विशेष आकर्षित करतो.

चित्रपटाचा पहिला भाग काहीसा लांब वाटतो. मात्र चित्रपट पाहताना आपणही 'कबीर-प्रिती'च्या प्रेमात आपोआप बुडतो. चित्रपटात प्रेम, राग, ड्राम, अॅक्शन असा सर्वच ताळमेळ बसवण्यात आला आहे. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोघं, आयुष्याच्या एका वळणावर असे काही हतबल होतात की कोणताच मार्ग सापडत नाही. अशीच प्रेमकथा अनुभवण्यासाठी, शाहिदचा जबरदस्त अभिनय पाहण्यासाठी 'कबीर सिंह' पाहायला नक्कीच हरकत नाही.