शाहीद कपूरच्या बहिणीचं लग्न, 'या' प्रसिद्ध कुटुंबाची होणार सून

गुपचूपपणे साखपुडा उरकल्यानंतर शाहीदच्या बहिणीची लगीन घाई..., कोण आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार...  

Updated: Mar 2, 2022, 11:20 AM IST
शाहीद कपूरच्या बहिणीचं लग्न, 'या' प्रसिद्ध कुटुंबाची होणार सून title=

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनंतर आता अभिनेता शाहीद कपूरची बहिण सना कपूरही लग्न बंधनात अडकणार आहे. सना मनोज पाहवा आणि, सीमा पाहवा यांचा मुलगा मयांक पाहवासोबत लग्न करणार आहे. 2 मार्च म्हणजे आज सना आणि मयांक लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी कपूर आणि पाहवा कुटुंब महाबळेश्वरला पोहोचलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगत आहेत. 

एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी त्यांचा साखरपुडा देखील झाला. शाहिद कपूरच्या अचानक गुपचूपपणे झालेल्या साखरपुड्याच्या बातमीनंतर अनेक तरुणींचा अपेक्षाभंग झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vivaan Shah (@thesurrealvivaanshah)

त्याच्यानंतर 'शानदार' फेम त्याची बहिण सना कपूर हिनं देखील त्याच्याचं पावलावर पाऊल ठेवत गुपचूपपणे काही दिवसांपूर्वी साखरपुडा उरकून घेतला.  पाहवा आणि कपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून फॅमिली फ्रेंड आहेत. 

सना आणि मयंक अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. काही महिन्यांआधी दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. आज सना आणि मयांक लग्न बंधनात अडकणार आहे.