शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये घुसला जबरा फॅन, कपडे काढून करू लागला धक्कादायक काम

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत

Updated: Jan 18, 2022, 01:50 PM IST
 शाहरुख खानच्या 'मन्नत'मध्ये घुसला जबरा फॅन, कपडे काढून करू लागला धक्कादायक काम title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. भारतातच नाही तर परदेशातही त्याचे चाहते आहेत. शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जातात. अनेकवेळा चाहत्यांनीही शाहरुख खानला त्यांच्या वागण्याबोलण्याने हैराण केलं आहे. एकदा असं घडलं की, शाहरुख खानचा एक जबरा चाहता मन्नतमध्ये घुसला होता आणि त्याने याचं कारण सांगितल्यावर खुद्द शाहरुखही थक्क झाला होता.

मन्नतमध्ये गुपचूप घुसला  फॅन
एका वृत्तानुसार, शाहरुख खानच्या एका चाहत्याने गुपचूप मन्नतमध्ये त्याच्या घरात  प्रवेश केला. याचा खुलासा खुद्द शाहरुखने केला आहे. त्याने सांगितलं की, त्याचा फॅन त्याच्या घरात घुसला आणि त्याने कपडे काढले आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला सुरुवात केली. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्याला लगेच पकडलं.

कारण ऐकून बसेल धक्का
जेव्हा सुरक्षा रक्षकाने चाहत्याला घरात प्रवेश का केला असं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, शाहरुख खान ज्या पूलमध्ये आंघोळ करतो त्या पूलमध्ये मला आंघोळ करायची आहे. त्याने असंही सांगितले की तो शाहरुख खानला भेटायला किंवा त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला नव्हता, त्याला फक्त पूलमध्ये आंघोळ करायची होती.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत काम केलं होतं. मात्र, दिग्दर्शक आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला.