थिएटरमध्ये काम करायला आवडेल - शनाया

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया अर्थात रसिका सुनील सर्वांच्याच परिचयाची आहे. 

Updated: May 25, 2018, 04:13 PM IST
थिएटरमध्ये काम करायला आवडेल - शनाया title=

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया अर्थात रसिका सुनील सर्वांच्याच परिचयाची आहे. या मालिकेच्या निमित्ताने रसिका घरांघरात पोहोचलीये. या मालिकेत तिची भूमिका नकारात्मक आहे. मात्र तरीही प्रेक्षक तिच्यावर राधिकाइतकंच प्रेम करतात. त्यामुळेच अल्पावधीत तिचं कॅरेक्टर प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालं. मालिका मसालाच्या निमित्ताने झी २४ तासच्या प्रेक्षकांनी शनायासोबत गप्पा मारल्या. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. शनाया अर्थात रसिकाला मालिकाप्रमाणेच नाटक कऱण्याची आवड आहे. तिला जर एखादे चांगले नाटक मिळाले तर ती नक्कीच नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येईल. दरम्यान तिला तिच्या ड्रीम रोलबद्दल विचारले असता ती म्हणाली, माझी या क्षेत्रातील करिअरची नुकतीच सुरुवात आहे. त्यामुळे कोणताही रोल हा माझ्यासाठी सध्यातरी ड्रीम रोल असेल. मात्र साहसी भूमिका करायला मला आवडेल.