हॉलिवूड अभिनेत्यावर 8 महिलांचा यौन शोषण केल्याचा आरोप

हॉलिवूड इडंस्ट्रीमध्ये सध्या एका बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे.

Updated: May 25, 2018, 01:54 PM IST
हॉलिवूड अभिनेत्यावर 8 महिलांचा यौन शोषण केल्याचा आरोप

मुंबई : हॉलिवूड इडंस्ट्रीमध्ये सध्या एका बातमीने चांगलीच खळबळ उडाली आहे. एका हॉलिवूड अॅक्टरवर 8 महिलांनी यौन शोषण केल्याचा आरोप केला आहे. हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक मॉर्गन फ्रीमॅनवर या महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. मॉर्गनने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पत्रकारांसह अनेक महिलांनी गेल्या 5 दशकांमध्ये मॉर्गन यांच्यावर यौन शोषण केल्याचा आरोप केला आहे.

मॉर्गनवर आरोप करणारी एक महिला प्रोडक्शन असिस्टेंट देखील आहे. जीने 2015 मध्ये फ्रीमॅन यांचा सिनेमा 'गोइंग इन स्टाईल' या सिनेमासाठी काम केलं होतं. पण नोकरी मिळाल्यानंतर या महिलेने आरोप केला की, फ्रीमॅनने तिचा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला होता.