close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या शेतकरी गायकाला शंकर महादेवन देणार संधी

बॉलिवूडमध्ये एक ब्रेक मिळावा म्हणून लोकांना वर्षांनुवर्ष चपला झिजवाव्या लागतात. 

Updated: Jul 4, 2018, 06:08 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या शेतकरी गायकाला शंकर महादेवन देणार संधी

मुंबई : बॉलिवूडमध्ये एक ब्रेक मिळावा म्हणून लोकांना वर्षांनुवर्ष चपला झिजवाव्या लागतात. पण मेहनतीला प्रामाणिकपणाची जोड असल्यास योग्यवेळी त्यांना फळ मिळतेच. केरळमध्येही अशाच एका गायकाचं नशीब उघडलं आहे.  

सोशल मीडियामध्ये आजकाल कोणतीही गोष्ट सहज व्हायरल होते. मात्र एखादी गोष्ट हटके आणि सकारात्मक असेल तर त्याला दादही मिळतेच. 

केरळमधला सुरेल शेतकरी 

 

काही दिवसांपूर्वीपासून एका केरळी शेतकरी गायकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा गायक विश्वरूपम चित्रपटातील  'उन्नी कानाडु नान' हे गाणं गात होता. या गाण्याचे मूळ गायक शंकर महादेवन यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच  कौतुक केलं. त्याचं नाव, गाव ठाऊक नसल्याने विचारणा करून त्याच्याशी संपर्क साधला.  

शंकर महादेवनसोबत काम करण्याची संधी 

 

शंकर महादेवनला भावलेल्या या गायकाचं नाव राकेश उन्नी आहे. सध्या शंकर महादेवन परदेशात असल्याने लवकरच भारतामध्ये परतल्यानंतर ते राकेशसोबत काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शंकर महादेवन यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.