'शंकरा रे शंकरा' तान्हाजी सिनेमातील नवं गाणं

अजय आणि सैफ अली खान पावरफुल लूकमध्ये 

Updated: Dec 3, 2019, 02:12 PM IST
'शंकरा रे शंकरा' तान्हाजी सिनेमातील नवं गाणं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा मल्टी स्टारर अपकमिंग सिनेमा 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' चं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'शंकरा रे शंकरा' असे या गाण्याचे बोल आहेत. अजय देवगनने इंस्टाग्रामवर हे गाणं रिलीज केलं आहे. 

तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत असलेला अजय देवगन या गाण्यात उदयभान साकारत असलेल्या सैफ अली खानच्या समोर हे गाणं सुरू आहे. या गाण्यात अजय आणि सैफ अली खान पावरफुल लूकमध्ये दिसत आहेत. 'दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूं' हा डायलॉग टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. या गाण्यात अजय सैफ अली खानच्या समोर नाचताना दिसत आहे.('तान्हाजी...' म्हणजे एक मोठा योगायोग- देवदत्त नागे)

19 नोव्हेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद ट्रेलरला मिळाला आहे. अजय देवगनचा हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.  'तान्हाजी' हा अजय देवगनच्या करिअरमधील 100 वा सिनेमा आहे. अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील आहेत. यामध्ये सुर्याजी मालुसरेची भूमिका देवदत्त नागेने तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने साकारली आहे. अजिंक्य देव हे देखील या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. जीजामाता यांच्या भूमिकेत पद्मावती राव साकारत आहेत. (....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं)

अजय देवगन आणि काजोलच्या सिनेमाला घेऊन प्रेक्षक भरपूर उत्सुक आहेत. काजोल या सिनेमात मराठमोळ्या लूकमध्ये दिसणार असून तान्हाजीची पत्नी सावित्री मालुसरेची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 17 व्या शतकातील मराठा सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले मित्र तान्हाजी मालुसरेंवर आधारित आहे.