'धडक'वर होणाऱ्या टीकेवर भडकला दिग्दर्शक शशांक खेतान, काय म्हणाला

का भडकला शशांक खेतान 

'धडक'वर होणाऱ्या टीकेवर भडकला दिग्दर्शक शशांक खेतान, काय म्हणाला

मुंबई : जान्हवी आणि ईशानचा डेब्यू असणारा 'धडक' सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा मराठीतील ब्लॉक ब्लस्टर ठरलेल्या 'सैराट' या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाने इंडियन बॉक्स ऑफिसवर 50.50 करोड रुपये कमाई केली आहे. पण असं असलं तरीही या सिनेमाची नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमासोबत तुलना केली आहे. सैराट हा सिनेमा वेगळ्या ढंगात तयार करण्यात आला आहे. याची गोष्ट वेगळ्या रुपात मांडली आहे. त्यामुळे या सिनेमाचं महाराष्ट्रातच नाही तर परदेशात देखील कौतुक झालं आहे. सैराटने नॅशनल अवॉर्ड जिंकला या सगळ्यामुळे सैराटसोबत धडकची तुलना होत आहे. 

तसेच समिक्षकांनी देखील सैराटसोबत धडकची तुलना केली आहे. सैराट हा सिनेमा प्रत्येकाला आपला वाटतो. कारण त्याच्या त्यातील साधेपणा. आणि आता याच्याशीच धडकची तुलना केली जात आहे. मात्र धडक हा सिनेमा जरी त्याचा रिमेक असला तरीही त्यामध्ये काही बदल केले आहेत. आणि हे बदल प्रेक्षकांना रुचलेले नाहीत. यामधील पात्रांवर अधिक लक्ष देऊन कथेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. सिनेमामध्ये काही गोष्टी चढवून सांगितल्या आहेत असा दावा देखील प्रेक्षकांनी केला आहे. 

का भडकला शशांक खेतान 

यावर दिग्दर्शक शशांक खेतानने दिलं आहे. शशांक म्हणतो की, मला माहित आहे, जेव्हा आपण रियलिज्मबद्दल बोलू तर ताजमहल देखील खरा आहे. उदयपुरमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते कसं दिसतं. मी माझ्यापद्धतीने उदयपुरला अधिक सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पार्थवी म्हणजे जान्हवी राजपूत कुटुंबातील असल्यामुळे ती जास्त श्रीमंत आहे.