Shehnaaz Gill Video: का आली पंजाबच्या कतरिनावर तोंड लपवण्याची वेळ?

सर्वांसमोर तोंड लपवण्याची वेळा का आली शहनाजवर, सोशल मीडियावर रंगतेय अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा  

Updated: Jun 22, 2022, 02:45 PM IST
Shehnaaz Gill Video: का आली पंजाबच्या कतरिनावर तोंड लपवण्याची वेळ? title=

मुंबई : बिग बॉस 13  ची स्पर्धक  अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सोशल मीडियावर खूप पॉप्यूलर आहे.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शहनाज कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट करत असते. आता देखील शहनाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शहनाजने व्हिडीओमध्ये तोंड लपवल्यामुळे अभिनेत्री  चर्चेत आली आहे. 

व्हिडीओमध्ये शहनाजने हुडी घातली आहे. विमानतळावर जेव्हा शहनाजसमोर कॅमेरामेन आले, तेव्हा अभिनेत्रीने तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, तर ती पुढे धावत देखील गेली. व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'बिग बॉस 13' फेम शहनाज गिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, शहनाज गिल 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक जस्सी गिलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

शहनाजला जरी खऱ्या आयुष्यात तिचं प्रेम अद्याप मिळालं नसलं तरी या सिनेमासाठी तिला तिचं प्रेम मिळालं आहे. त्यामुळे सिनेमात शहनाजला चाहते रोमँन्टिक अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

शहनाज हे बिग बॉस 13 नंतर प्रसिद्ध नाव बनलं होतं. त्याचबरोबर, सिद्धार्थ शुक्लासोबतच्या तिच्या नात्याच्या खूप चर्चा झाल्या आणि चाहत्यांनी त्यांना सिदनाझ हे नाव दिलं. 

मात्र, गेल्यावर्षी सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला धक्का बसला. त्यातून ती हळूहळू सावरत आहे. गेल्यावर्षी ती दिलजीत दोसांझसोबत पंजाबी चित्रपट 'हौंसला रख'मध्ये दिसली होती.