"सिद्धार्थ- सिद्धार्थ" ओरडत स्मशानात पळत गेली शेहनाज गिल

भिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे नाते संपूर्ण जगाला माहित आहे. 

Updated: Sep 4, 2021, 10:34 AM IST
"सिद्धार्थ- सिद्धार्थ" ओरडत स्मशानात पळत गेली शेहनाज गिल title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे नाते संपूर्ण जगाला माहित आहे. दोघेही एकमेकांवर अपार प्रेम करायचे आणि जेव्हाही ते एकमेकांसोबत दिसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. बिग बॉस हाऊसपासून बिग बॉस ओटीटी पर्यंत, जेव्हाही हे दोघे एकत्र दिसले, तेव्हा दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली.

असं होत सिद्धार्थ-शेहनाजमध्ये प्रेम

सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल अलीकडेच 'बिग बॉस ओटीटी' आणि 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये दिसले होते.  सिद्धार्थ शुक्ला आपल्या सर्वांना इतक्या लवकर सोडून जाईल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता? अभिनेत्याच्या मृत्यूनंतर शेहनाज गिलची प्रकृती अत्यंत वाईट आहे. स्मशानभूमीतून सिद्धार्थचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात अभिनेत्री बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

सिद्धार्थ-सिद्धार्थ ओरडताना दिसली शेहनाज

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, शेहनाज गिल सिद्धार्थ-सिद्धार्थ ओरडत अंत्यसंस्कारस्थळी पोहोचली. अभिनेत्रीची अवस्था पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की तिला सिद्धार्थच्या जाण्याचा मोठा धक्का बसला आहे. सिडनाजच्या प्रेमाची चर्चा टीव्ही जगतापासून बी-टाऊनपर्यंत होती.

शेहनाजला करायचे होते लग्न 
अलीकडेच, अबू मलिकने हे देखील उघड केले की शेहनाज गिलला बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाशी लग्न करायचे होते. अबू मलिकने सांगितले की, शेहनाज गिलने अबूला जाण्याची विनंती केली होती आणि यासाठी सिद्धार्थला राजी केले. चाहत्यांनाही बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की त्यांना सिदनाजचे लग्न पाहायला मिळावे पण ते होऊ शकले नाही.