शहनाज आजही सिद्धार्थची खास गोष्ट सोबत घेऊन जगतेय, चाहते म्हणाले....

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदाच अशी दिसली शहनाज 

Updated: Dec 1, 2021, 04:34 PM IST
शहनाज आजही सिद्धार्थची खास गोष्ट सोबत घेऊन जगतेय, चाहते म्हणाले....

मुंबई : शहनाज गिल, तिचा प्रियकर आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर खूप एकटी पडली आहे. सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या 40 व्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शहनाजला सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचा खूप मोठा फटका बसला आहे. तिचा मोठा आधार अचानक तिच्याकडून हिरावून घेतला आहे. 

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज 'होंसला राख' च्या प्रमोशनच्या वेळी पुन्हा कामावर दिसली.12 डिसेंबरला सिद्धार्थचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसापूर्वी शहनाज अनाथाश्रमात गेली. मुलांना भेटण्यासाठी तिने अनाथाश्रमाला थोडा वेळ घालवला.  अमृतसरच्या अनाथाश्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. शहनाजचा प्रियकर सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर तिला खूप मोठा धक्का बसला.  नंतर तिला आनंद वाटेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करताना पाहून चाहत्यांना आनंद झाला.

सिद्धार्थच्या आठवणीत केली खास गोष्ट

शहनाजने सिद्धार्थचा चष्मा घातलेला पाहून ट्विटरवर चाहत्यांनी #Sidnaaz ट्रेंड करण्यास सुरुवात केली. शहनाजने सिद्धार्थसोबत नसताना त्याच्या अगदी जवळची गोष्ट सोबत घेतली आहे. यामुळे सिद्धार्थ आणि शहनाज एकच असल्याच भासत आहे. शहनाजने यावेळी जीन्स, बूट, हिरवा फुल स्लीव्हज टी घातला होता. आणि तो लोकरीच्या श्रगसोबत जोडला होता. शहनाजने अमृतसरमधील निराधारांसाठी असलेल्या पिंगलवाडा येथे भेट दिली आणि मुले आणि वृद्ध लोकांसोबत वेळ घालवला.

सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज गिलला तिच्या आयुष्यात परत आल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. चाहते सिद्धार्थ आणि शहनाजची जोडीला अद्याप विसरलेले नाही. ही जोडी आजही प्रेक्षक मनापासून पसंत करत आहेत.