sidharth shukla death : सिद्धार्थसोबत लग्न करण्याची शेहनाजची होती इच्छा; जवळच्या व्यक्तीकडून खुलासा

शेहनाज नाराज असेल तेव्हा सिद्धार्थ देखील... जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

Updated: Sep 3, 2021, 09:09 AM IST
sidharth shukla death : सिद्धार्थसोबत लग्न करण्याची शेहनाजची होती इच्छा; जवळच्या व्यक्तीकडून खुलासा

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना आणि समस्त कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ह्रदय विकाराच्या झटक्याने अवघ्या 40व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. बिग बॉस 13 सीझन गाजवलेल्या सिद्धार्थच्या नव्या आयुष्याची सुरूवात या घरातून  झाली. कारण त्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली. शेहनाज आणि सिद्धार्थमध्ये प्रेमाचा गुलाब बहरला तो म्हणजे बिग बॉसच्या घरातून. घरातून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न  चाहते विचारायचे. 

सिद्धार्थच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. पण खास होती ती शेहनाज. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे कोलमडली असल्याचं सांगण्यात येत आहे. सिद्धार्थसोबत लग्न करण्याची इच्छा शेहनाजच्या मनात होती. रिपोर्टनुसार अनू मलिकने सांगितलं की शेहनाजला सिद्धार्थसोबत लग्न करायचं होतं. पण आता शेहनाजची ही इच्छा कधीही पूर्ण होवू शकत नाही. 

अनू मलिक म्हणाला, 'लॉकडाऊनच्या एक दिवस आधी शेहनाजने मला सिद्धार्थबद्दल सांगितलं होतं.' एवढंच नाही तर सिद्धार्थने देखील अनूला सांगितलं होतं की एक दिवस जरी शेहनाज माझ्यामुळे नाराज असेल तर माझा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे सिद्धार्थच्या मृत्यूचा सर्वात मोठा धक्का शेहजानला बसला आहे. 

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजची परिस्थिती काय आहे, या बद्दल सर्वाना जाणून घ्यायचं आहे. आमची सहयोगी वेबसाईट DNAच्या रिपोर्टनुसार जेव्हा शेहनाजला सिद्धार्थच्या निधनाबद्दल माहिती मिळाली तेव्हा ती शुटिंगमध्ये व्यस्त होती.