ये तो बडा टॉइंग है... ‘शिकारी’चा हॉट टीझर... तुम्हांला आवडतो का पाहा... प्रतिक्रिया कळवा...

  सिनेप्रेमींच्या पारंपारिक संवेदनांना मराठी चित्रपट ‘शिकारी’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवड्यात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे, त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे. महेश वामन मांजरेकर या बहु-आयामी चित्रपट व्यक्तिमत्वाने या चित्रपटाचे सादरीकारण केले आहे, त्यामुळे ही जिज्ञासा अधिकच ताणली गेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने या आणखी एका प्रख्यात दिग्दर्शकाने केले आहे.

Prashant Jadhav Updated: Mar 13, 2018, 06:14 PM IST
ये तो बडा टॉइंग है... ‘शिकारी’चा हॉट टीझर... तुम्हांला आवडतो का पाहा... प्रतिक्रिया कळवा...

मुंबई :  सिनेप्रेमींच्या पारंपारिक संवेदनांना मराठी चित्रपट ‘शिकारी’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवड्यात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे, त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची जिज्ञासा निर्माण केली आहे. महेश वामन मांजरेकर या बहु-आयामी चित्रपट व्यक्तिमत्वाने या चित्रपटाचे सादरीकारण केले आहे, त्यामुळे ही जिज्ञासा अधिकच ताणली गेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने या आणखी एका प्रख्यात दिग्दर्शकाने केले आहे.

सोशल मीडियावर टीका...

पण हा टीझर मराठी प्रेक्षकांच्या पचनी पडतो का असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.  या चित्रपटाच्या टीझरमध्ये नवख्या नेहा खान हीने अंगभर प्रदर्शन केले आहे. अशा पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन हा मराठी प्रेक्षकांना धक्का असल्याचे मतही सोशल मीडियावर व्यक्त केले जात आहे. 

टीझरच्या शेवटी एका जाहिरातीच्या दृश्याचा आधार घेतला आहे. ये तो बडा टॉइंग है या जाहिरातीतील हॉट आशय या ठिकाणी घेतल टीझर संपवला आहे. 

 

 

सेक्स कॉमेडीका... 

महेश मांजरेकर यांचे चित्रपट हे वैविध्यपूर्ण कथानकासाठी ओळखले जातात तसेच ते एक वेगळी वाट चोखाळतात. त्याचमुळे मग ‘शिकारी’ हा सिनेमा एक हास्यपट आहे की सेक्स कॉमेडी आहे की एक गंभीर सामाजिक नाट्य आहे, याबद्दल मराठी चित्रपट रसिकांमध्ये उत्सुकता आहे.

नेहा खान नवा चेहरा...

 नेहा खान या पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीचा कमनीय बंधा आणि तिने या टीजरमध्ये साकारलेल्या कामुक अदा यांमुळे रसिकांना अधिकच प्रश्नांकित केले आहे. हा चित्रपट म्हणजे नेहमीप्रमाणे एक बोल्ड चित्रपट असेल की त्याचा गाभा अगदीच वेगळा असेल की मग मराठीतील हा एक अभूतपूर्व असा हा चित्रपट असेल, याबद्दल रसिकांमध्ये चर्चा झडू लागली आहे. तसे प्रश्नच या चित्रपटाबद्दल विचारले जाऊ लागले आहेत.
 
‘शिकारी’ या चित्रपटात नेहा खान हीने मध्यवर्ती भूमिका पार पाडली असून आर्यन ग्लोबल एंटरन्टेन्मेटच्या विजय पाटील यांनी त्याची निर्मिती केली आहे.