close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून शिल्पाने नाकारली १० कोटींची ऑफर

जाहिरात करण्यासाठी शिल्पाचा नकार 

Updated: Aug 17, 2019, 07:10 PM IST
...म्हणून शिल्पाने नाकारली १० कोटींची ऑफर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे सतत चर्चेत असते. शिल्पाच्या अनेक फिटनेस व्हिडिओनाही चाहत्यांची पसंती मिळत असते. शिल्पाने तिचं फिटनेस अॅपही लॉन्च केलं आहे. नुकतंच शिल्पाला एका जाहिरातीसाठी १० कोटींची ऑफर देण्यात आली होती. पण शिल्पाने ही जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे.

'बॉलिवूड लाइफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका आयुर्वेदिक कंपनीने शिल्पाला स्लिमिंग पिलच्या जाहिरातीसाठी १० कोटींची ऑफर केली. पण शिल्पाने ही जाहिरात करण्यासाठी नकार दिला आहे.

एका मुलाखतीत शिल्पाने, ज्यावर माझा विश्वास नाही, अशी कोणतीच गोष्ट मी विकू शकत नसल्याचं सांगतिलं. पिल्स काही दिवसांतच परिणाम दाखवत असल्या तरी ते केवळ ग्राहकांना आकर्षित करण्याचं काम करतात. पण आपलं चांगलं खाणं आणि चांगली जीवनशैली अशाप्रकारच्या पिल्सवर मात करु शकत नसल्याचंही शिल्पाने म्हटलंय.

शिल्पा डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. पण बॉलिवूडपासून लांब असलेली शिल्पा येत्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याचं बोललं जात आहे.