शिल्पा तुळसकर लवकरच दिसणार 'तुला पाहते रे' मालिकेत

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Mar 23, 2019, 05:51 PM IST
शिल्पा तुळसकर लवकरच दिसणार 'तुला पाहते रे' मालिकेत

मुंबई : झी मराठी वरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकली. प्रेमाला कोणत्याच प्रकारच्या मर्यादा बंधणे नसल्याचे ईशा आणि विक्रांतच्या नात्यातून स्पष्ट होते. विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोख्या जोडीला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिका चाहत्यांचे विशेष मनोरंजन करत आहे. तर या मालिकेला लवकरच एक वेगळे वळण लागणार आहे. मालिकेत विक्रांतची पहिली पत्नी म्हणजेच शिल्पा तुळसकरची एन्ट्री होणार आहे. 

ईशाला आपल्या प्रेमाच्या जाऴ्यात अडकवून आपले ध्येय सिद्ध करण्याच्या वाटेकडे विक्रांतचा कल असल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. मालिकेत प्रेक्षकांना एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेतील विक्रांतचा खरा खूरा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आनंदाचे रंग उडवा आणि आनंदी रहा @shilpatulaskar

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

नुकताच अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. 'तुला पाहते रे' मालिकेच्या शीर्षक गीतात पहिल्यापासूनच आपल्याला शिल्पा तुळसकर पाहायला मिळत आहे. लवकरच तिची भूमिका छोट्या पडद्यावर दाखल होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून शिल्पाची मालिकेत एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण येत आहे. तर आता मालिकेत शिल्पा कशा प्रकारे एन्ट्री करते आणि मालिकेला कसे वळण प्राप्त होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.