किती ते दुर्दैव; होळी साजरी करून घरी परतणाऱ्या अभिनेत्रीचं अपघाती निधन

जगणं किती अशाश्वत आहे, हे काही प्रसंग सांगून जातात

Updated: Mar 21, 2022, 02:44 PM IST
किती ते दुर्दैव; होळी साजरी करून घरी परतणाऱ्या अभिनेत्रीचं अपघाती निधन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जगणं किती अशाश्वत आहे, हे काही प्रसंग सांगून जातात. सध्या एका अभिनेत्रीचा करुण अंत झाला आणि पुन्हा एकदा हीच बाब समोर आली. 'मॅडम सर मॅडम अंते' (Madam Sir Madam Ante) या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री गायत्री हिचं निधन झालं आहे. 

हैदराबाद येथील गच्चीबोली भागामध्ये घरी परततेवेळी तिचा एका अपघाती मृत्यू झाला. अवघ्या 26 व्या वर्षी या अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेलत्यामुळं संपूर्ण दाक्षिणात्य कला जगतातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. (Accident death)

शुक्रवारी आपल्या घरातून रात्री होळी साजरी करून परतत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. यावेळी अभिनेत्रीचा मित्र कार चालवत होता असं कळत आहे. 

चालकाचं कारवर असणारं नियंत्रण सुटलं आणि ती डिवायडरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातामध्ये अभिनेत्रीच्या मित्राचाही जीव गमावला. 

अपघाताचं स्वरुप इतकं भीषण होतं, की गायत्रीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, तिच्या मित्राला जखमी अवस्थेतच रुग्णालयात नेण्यात आलं. पण, त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. 

असं म्हटलं जात आहे की यामध्ये आणखी एका महिलेनं प्राण गमावले आहेत. पण, तिची ओळख मात्र अद्यापही समोर आलेली नाही. 

जलसा रायदू या युट्यूब चॅनलमुळं गायत्रीला कमालीची लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर ही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय होती. तिच्या निधनामुळं कुटुंबीयांनाही जबर हादरा बसला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x