close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'साहो'चं नवं पोस्टर रिलीज; टीजर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या कधी होणार 'साहो'चा टीजर प्रदर्शित

Updated: Jun 12, 2019, 07:34 PM IST
'साहो'चं नवं पोस्टर रिलीज; टीजर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास त्याच्या आगामी 'साहो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'साहो'मध्ये प्रभाससोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर स्क्रिन शेअर करणार आहे. 'साहो' या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं आणखी एक पोस्टर समोर आलं आहे. प्रभासचा हा बहुचर्चित चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच 'साहो'चं एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. प्रभासने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये प्रभासने 'आणखी एक दिवस... तुम्ही साहोच्या दुनियेत सवारी करण्यासाठी तयार आहात का?' असा सवाल करत पोस्ट केली आहे. या पोस्टरसह प्रभासने 'साहो'च्या टीजरचीही घोषणा केली आहे. या पोस्टरमध्ये प्रभास दुचाकीवर बसला असून मागे काही गाड्या उडताना दिसत आहेत.  

श्रद्धा कपूरच्या फर्स्ट लूकसह 'साहो'च्या टीजरची घोषणा केली गेली आहे. १३ जून दुपारी ११.२३ वाजता टीजर रिलीज होणार आहे. २०१७ साली 'बाहुबली' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दरम्यानही चित्रपटाचा एक टिजर प्रदर्शित करण्यात आला होता. 

प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. 'साहो' चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीथ यांनी केलं आहे. 'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.