रातोरात श्रद्धा कपूरला सिनेमातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फिल्म इंडस्ट्री मध्ये श्रद्धा कपूरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडशी कनेक्ट फॅमिली बॅकग्राऊंड असूनही श्रद्धाला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे सोपं नव्हतं. 

Updated: Mar 28, 2023, 06:50 PM IST
रातोरात श्रद्धा कपूरला सिनेमातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण title=

मुंबई : श्रद्धा कपूर तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकते. श्रद्धा कपूर मुव्हीजने 2010 मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकताच अभिनेत्रीचा  'तू झुठी मैं मक्कर' हा सिनेमा रिलीज झाला.  2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली 'तू झुठी मैं मक्कर'  या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरची केमिस्ट्री खूप आवडली होती.. आज श्रद्धा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. 

फिल्म इंडस्ट्री मध्ये तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडशी कनेक्ट फॅमिली बॅकग्राऊंड असूनही श्रद्धाला चित्रपटसृष्टीत स्थान मिळवणे सोपं नव्हतं. जेव्हा ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी कष्ट घेत होती, तेव्हा तिला काही सिनेमांच्या ऑफरही आल्या होत्या जे तिला करायचं नव्हत्या.

श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती अमिताभ बच्चनसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, ज्याचा फटका श्रद्धाला सहन करावा लागला. तीन पट्टी फ्लॉप झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांचा 'माय फ्रेंड पिंटू' हा चित्रपटही तिच्या हातातून निसटला. एवढंच नाही तर यानंतर एका टॉप डायरेक्टरने अभिनेत्रीला बोल्ड चित्रपटाची ऑफर दिली.  मात्र त्या दिग्दर्शकाकडून तिला ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्याची ही ऑफर ऐकून श्रद्धाला धक्का बसला होता.

खरं तर, श्रद्धाला चित्रपट निर्मात्याला हे कसं सांगावं हे समजत नव्हतं की, तिला असे चित्रपट करण्यात काहीच रस नव्हता. मात्र, नंतर तिने आपला हेतू चित्रपट निर्मात्याला सांगितला. श्रद्धाने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'तीन पत्ती' रिलीज होण्यापूर्वी मी 'माय फ्रेंड पिंटू'साठी ऑडिशन दिलं होतं. मला कोणत्याही किंमतीत या प्रोजेक्टमध्ये काम करायचं होतं, त्यासाठी मी माझ्या रात्रंदिवस एक केले. मात्र, तुझ्या जागी दुस-याला कास्ट केल्याचा फोन आल्यावर मी पूर्ण तीन दिवस माझ्या खोलीत बसून रडले होते. यानंतर बॉक्स ऑफिसवर एकच गोंधळ उडाला.

श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने 2010 मध्ये तिच्या पहिल्या चित्रपट "तीन पत्ती" द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने 'आशिकी २' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल. याशिवाय श्रद्धा कपूरने बागी, ​​साहो, एक व्हिलन, हाफ गर्लफ्रेंड, स्ट्रीट डान्सर 3डी, स्त्री भेडिया, छिछोरे, ओके जानू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. सध्या त्याचा 'तू झुठी मैं मक्कर' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.