लग्नानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पत्नी मितालीसाठी बनवली 'ही' स्पेशल डिश

लग्नानंतर तुलाही मितालीने घरकाम करायला लावलं की काय 

Updated: Jun 22, 2021, 09:07 PM IST
लग्नानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने पत्नी मितालीसाठी बनवली 'ही' स्पेशल डिश

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. दोघेही आपल्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. नुकताच सिद्धार्थने आपल्या लाडक्या बायकोसाठी खास डिश बनवली आहे.. मिताली उत्तम कुक आहे हे सर्वांनाच माहित आहे.. तिला चमचमीत खायला आणि खाऊ घालायला फार आवडतं. पण म्हणतात ना बायकोसमोर कुणाचं ही चालत नाही. तसंच काहीस सध्या सिद्धार्थसोबत देखील घडतंय असंच दिसतंय..  

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक असे हटके फोटो पोस्ट करणाऱ्या सिद्धार्थ नुकताच साबुदाणा खिचडी बनवतानाचा व्हिडिओ शेअर केलाये. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाये. त्यात अनेकांनी सिद्धार्थला लग्नानंतर तुला ही मितालीने घरकाम करायला लावलं की काय ? असा प्रश्न विचारायला सुरुवात केलीये.

सध्य़ा शुटींगवर देखील काहीसे निर्बंध आहेत त्यामुळे कलाकारांना आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करता येतोयं. त्यामुळे सिद्धार्थने ही वेळ मिळताच किचनकडे धाव घेत छान साबुदाणा खिचडी तयार केलीये..

सिद्धार्थ आणि मितालीने २०२१ च्या सुरुवातीला लग्नगाठ बांधत सात ही जन्म एकत्र राहण्याचं वचन एकमेकांना दिलं..  आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली.. सिद्धार्थ सध्या सांग तू आहेस ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय ,तर  मिताली लाडाची मी लेक गं या मालिकेत काम करतेय.

दोघेही आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ मिळाला की सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतात.. मराठी इंडस्ट्रीतील ही सध्या सगळ्याचीच लाडकी जोडी बनलीये.