शहनाज नाही तर सिद्धार्थ शुक्लाचा झाला होता 'या' मुलीसोबत हार्टब्रेक; झाली होती वाईट अवस्था

सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नसला तरी पण त्याची गोड स्माईल आजही चाहत्यांच्या हृदयात आहे.

Updated: Apr 20, 2022, 05:50 PM IST
शहनाज नाही तर सिद्धार्थ शुक्लाचा झाला होता 'या' मुलीसोबत हार्टब्रेक; झाली होती वाईट अवस्था title=

मुंबई : सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात नसला तरी पण त्याची गोड स्माईल आजही चाहत्यांच्या हृदयात आहे. सिड बिग बॉसमध्ये दिसला होता. जिथे पंजाबची कतरिना कैफ शहनाज गिल त्याच्या प्रेमात पडली होती. सिडलाही शहनाज आवडू लागली आणि बाहेर आल्यानंतरही दोघं फ्रेंडशिपमध्ये होते. पण सिडवर एककाळ अशीवेळ आली की, तो कोणाच्या तरी प्रेमात पडला आणि या ब्रेकअपनंतर त्याने केस वाढवले. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. आणि ब्रेकअपनंतर तो दिवसरात्र तिच्या घराभोवती फिरु लागला. आता ही वेळ सिडवर नेमकी कोणामुळे आली होती. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सगळ्यात आधी हा एक सिनेमातील सीन आहे. त्यामुळे तुम्ही जर घाबरला असाल तर तसं करु नका.

ती दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोनिया राठी आहे. ज्यामध्ये ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 या वेबसिरीजमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबत ती त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत होती. जिच्यावर तो वेड्यासारखा प्रेम करत होता. या शोमधील सिडची भूमिका पाहून तुम्ही म्हणाल, 'प्यार करने वाला हो तो ऐसा'. त्याची सोनिया राठीसोबतची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.

एकता कपूरच्या या शोमध्ये सोनिया 'रूमी'च्या भूमिकेत होती आणि सिद्धार्थ शुक्ला 'अगस्त्य'च्या भूमिकेत होता. सोनिया राठी मूळची हिसारमधील हरियाणाची. सोनियांने आपल्या करिअरची सुरुवात डान्सने केली आणि सोनियाने प्रॉडक्शन डिझाईन म्हणूनही काम केलं आहे.

तिने सिद्धार्थ शुक्लासोबत ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सोनिया राठी ही अंकुर राठी यांची बहीण आहे. अंकुर 'फोर मोअर शॉट्स', 'मॉम: मिशन ओव्हर मार्स' सारख्या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. अभिनयात करिअर करण्यापूर्वी सोनिया अमेरिकेत राहत होती.

ब्रोकन बट ब्यूटीफुल 3 च्या आधी, तिने फिल्टर कॉपीमध्ये काम केलं होतं, ज्यामध्ये ती टीव्ही अभिनेता विशान वशिष्ठ सोबत दिसली होती. सोनिया राठीचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. जिथे ती डान्स व्हिडिओ शेअर करते. ती बहुतेक 90 च्या दशकातील गाण्यांवर डान्स करताना दिसते, लोकांना तिची नृत्य शैली आवडते.