एक्स पत्नीच्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, ऐकून म्हणाल कोण खरं कोण खोटं

प्रसिद्ध अभिनेत्याचा कायदेशीर वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे.

Updated: Apr 20, 2022, 05:30 PM IST
एक्स पत्नीच्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपावर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, ऐकून म्हणाल कोण खरं कोण खोटं title=

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री अंबर हर्ड यांच्यातील कायदेशीर वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. जॉनीने अंबरवर आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप करत 50 मीलियन डॉलर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ज्याचा खटला सध्या व्हर्जिनिया, यूएसए येथे सुरू आहे. दरम्यान, जॉनी डेपने एक्स पत्नी अंबर हर्डने आपल्याविरुद्ध केलेल्या मानहानीच्या दाव्यात स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, आपल्यावरील घरगुती हिंसाचाराचे सगळे आरोप खोटे आहेत.

एका वृत्तानुसार, डेप यांनी मंगळवारी दुपारी सांगितलं की, 'खोटं हे खोटंच असतं आणि सत्य हे कधी ना कधी बाहेर येत असतं'. आपण खोटं सिद्ध करू शकत नाही. त्याच्या स्वत: च्या चौकशीत, डेपने हे नाकारलं की, त्याने कधीही हर्ड किंवा इतर कोणत्याही महिलेला हिंसक वागणूक दिली आहे.

अंबरने जॉनी डेपवर रिलेशनशिप दरम्यान अनेकवेळा मारहाण, गळा दाबून तसंच लाथ मारल्याचा आरोप केला आहे. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या लढतीदरम्यान डेपने एकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही हर्डने केला होता. त्यानंतर 2016 मध्ये डेप आणि हर्डचा घटस्फोट झाला.

डिसेंबर 2018 मध्ये, हर्डने वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक अभिप्राय प्रकाशित केला. ज्यामध्ये तिने तिच्या पूर्वीच्या आरोपांचं स्पष्टीकरण दिलं. ज्यानंतर डेपने तिच्यावर $50 मिलियनचा दावा ठोकला. डेप म्हणाला होता की, मी केवळ माझ्यासाठी भूमिका घेणं आवश्यक मानलं नाही तर माझ्या मुलांसाठी भूमिका घेणं ही माझी जबाबदारी आहे. 'माझी मुलं शाळेत गेली तर त्यांना तिथल्या या प्रकरणाशी संबंधित गोष्टींची लाज वाटू नये म्हणून हे करणं माझ्यासाठीही गरजेचं होतं'.

डेप म्हणाला की, त्याच्यावरील आरोप अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारे आहेत. हर्डसोबतच्या नात्याच्या सुरुवातीबद्दलही त्याने सांगितलं की, सुरुवातीला ती खूप छान होती. 'तिने प्रेम केलं. ती हुशार होती, ती दयाळू होती, ती फनी होती, तिने मला समजून घेतलं. पण दीड वर्षातच ती खूप बदलली. जणू काही मी तिला ओळखतही नाही.