Sidharth Shukla Death: जेव्हा अर्जुन कपूरशी भिडलेला सिद्धार्थ; कोणी केलेली मध्यस्थी, पाहा व्हिडीओ

लगेच संतापायचा सिद्धार्थ 

Updated: Sep 2, 2021, 06:15 PM IST
Sidharth Shukla Death:  जेव्हा अर्जुन कपूरशी भिडलेला सिद्धार्थ; कोणी केलेली मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) या अभिनेत्याच्या अकाली एक्झिटनं सर्वांच्या मनाला चटका लागला. सिद्धार्थ चाहत्यांच्या मनात कायम स्मरणात राहील, हे कितीही सत्य असलं तरीही सिद्धार्थ का गेला, असाच प्रश्न चाहते आणि त्याचे मित्र उपस्थित करत आहेत. सिद्धार्थ कलाकार म्हणून जितका समृद्ध होता, तितकाच तो एक व्यक्ती म्हणूनही सर्वांना आवडेल असाच होता. 

लगेच संतापायचा सिद्धार्थ 
सिद्धार्थच्या स्वभावामध्ये त्याला अडचणीत आणणारी एक सवय होती, ती म्हणजे लगेच होणारा त्याचा संताप. सिद्धार्थला कोणीही चुकीचं ठरवू लागलं की त्याचा संताप होत असे. याच सवयीमुळं त्याचं सलमान खानसोबत खास नातं तयार झालं होतं. 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही त्याचं असंच रुप पाहायला मिळालं. जिथं तो अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी हुज्जत घालताना दिसला. 

का झालेला वाद? 
सिद्धार्थ (Sidharth Shukla) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) च्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथं या दोन्ही कलाकारांमध्ये कडाक्याचं भांडण होताना दिसत आहे. अर्जुन कपूर शोच्या चित्रीकरणाच्याच वेळी मध्येच बसला, हे सर्व तेव्हा झालं जेव्हा इतर सर्व स्पर्धक बराच वेळ झाल्यापासून तिथं उभे होते. त्याच विषयावरुन तिथं असणाऱ्या कलाकारांमध्ये वाद झाला. यामध्ये सिद्धार्थनं अर्जुनवर आवाज चढवत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

मुख्य म्हणजे हे प्रकरण बरंच चर्चेत येऊ लागल्याचं पाहून पुढे सिद्धार्शनंच हा एक प्रँक असल्याचं सांगितलं होतं. पण, सिद्धार्थनं हे सांगण्यापूर्वीच इतर स्पर्धकांच्या नजरेत हे खरंखुरं भांडण होतं, जे पाहून या दोन्ही कलाकारांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी इतर स्पर्धक पुढे आले होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x