पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला आता या जगात नाही. मे 2022 मध्ये त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आजपर्यंत या प्रकरणाची मूसेवाला कुटुंबीय न्यायासाठी याचना करत आहेत. मार्च 2024 मध्ये सिद्धू मूसेवालाच्या धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा या कुटुंबात आनंद वातावरण होतं. सिद्धू मूसेवाल्याच्या पालकांनी दुसऱ्या मुलाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला इंटरनेटवर खूप पसंती मिळत असून ही पोस्ट व्हायरल होत आहे.
सिद्धू मूसेवाला यांची आई चरण कौर यांनी वयाच्या 58 व्या वर्षी पुन्हा आई होण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ची मदत घेतली. यानंतर 17 मार्च 2024 रोजी सिद्धू मूसेवालाच्या घरी एका छोट्या राजकुमाराचा जन्म झाला. मूसेवाल्याच्या पालकांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव 'सुखदीप सिंग' ठेवले आहे. तर सिद्धू मूसवाला यांचे खरे नाव 'शुभदीप सिंग सिद्धू' होते.
आता कुटुंबाने सिद्धू मूसेवालाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर धाकट्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी स्वत: त्यांच्या धाकट्या मुलाला मांडीवर घेतले आहे, तर त्यांची पत्नी चरण सिंग त्यांच्या शेजारी बसलेली दिसत आहे. यासोबतच त्याने एक क्यूट व्हिडिओही शेअर केला आहे. 'जस्टिस फॉर सिद्धू मूसवाला' असा हॅशटॅगही त्यांनी वापरला.
सिद्धू मूसेवालाच्या भावाचा फोटो व्हिडिओ पाहून सर्व चाहतेही भावूक झाले. काहींनी त्याला सिद्धूची कार्बन कॉपी म्हटले तर काहींनी तो खूप गोंडस असल्याचे म्हटले. एका यूझरने लिहिले की, 'छोट्या सिद्धूला पाहिल्यानंतर माझ्या मनाला आनंद झाला.' तर दुसऱ्याने लिहिले, 'सिद्धू परत आला आहे.'
सिद्धू मूसवाला याचा जन्म 11 जून 1993 रोजी झाला होता. 29 मे 2022 रोजी गोल्डी बराड याच्या माणसांनी सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केली होती. आजपर्यंत या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. आजही त्याचे कुटुंबीय त्यांच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून याचना करत आहेत. सिद्धू मूसवाला यांनी 2021 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याची माहिती आहे.