गायक हनी सिंहने २० वर्षाच्या अफेयरनंतर बालमैत्रीणीशी केलं लग्न

गायक हनी सिंहच्या गाण्यावर बहुतांश लोक थिरकतात, हनी सिंग युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2018, 09:55 PM IST
गायक हनी सिंहने २० वर्षाच्या अफेयरनंतर बालमैत्रीणीशी केलं लग्न

नवी दिल्ली : गायक हनी सिंहच्या गाण्यावर बहुतांश लोक थिरकतात, हनी सिंग युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हनीसिंगच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण २० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने आता आपल्या मैत्रीणीशी लग्न केलं आहे.

कुणाशी केलं हनी सिंहने लग्न

हनी सिंहचे चाहते मोठ्या प्रमाणाता आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. हनी सिंहच्या पत्नीचं नाव शालिनी तलवार आहे. हनी सिंह आणि शालिनी हे वर्गमित्र होते, हनी सिंह आणि शालिनी यांच्यात बालपणापासून प्रेम होतं, मात्र ते कधीही प्रकर्षाने समोर आलं नाही, अनेकांना याबाबतीत माहिती नव्हती. दिल्लीतील गुरूनानक पब्लिक स्कूलमध्ये ही लव्ह स्टोरी सुरू झाली.

२० वर्षानंतरही ते प्रेम कायम

हनी सिंह लोकप्रिय झाल्यानंतर अनेकवेळा त्याची नावं इतरांशी जोडली गेली पण हनी सिंहने आपल्या बालमैत्रीणीशी प्रेम कायम ठेवलं. अखेर हनीसिंहने शिख पद्धतीने शालिनीशी विवाह केला. २० वर्षाच्या मैत्रीनंतर हनीसिंहने विवाह केला. हनी सिंह काही वर्षापूर्वी शिक्षणासाठी परदेशी गेला होता, तरी दोघांमघील प्रेम कायम राहिलं हे विशेष.