धक्कादायक! अपहरणानंतर चार आठवडे गायिकेवर बलात्कार

जगात महिलांवर होणाऱ्या आत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.  

Updated: Apr 7, 2020, 03:27 PM IST
धक्कादायक! अपहरणानंतर चार आठवडे गायिकेवर बलात्कार

मुंबई : जगाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज महिला सुरक्षित नाहीत. आजही बलात्कार, अपहरण, लैंगिक अत्याचारासारख्या घटना कनी पडत असतात. अशा मन हेलावून टाकणाऱ्या घटना फक्त सर्वसामान्य मुलींसोबतच नाही तर अनेक अभिनेत्री, गायिका यांच्यासोबत देखील होत असतात. तर वेल्सची पॉपस्टार गायिका डफीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे. अशी परिस्थिती यापुढे कोणत्याही मुलीसोबत होता कामा नये, याच उद्देशाने तिने स्वत:ची परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणली आहे. 

द गार्जियन डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, तिने तिच्यावर ओढावल्याचा प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'माझा वाढदिवस होता. मला एका हॉटेलमध्ये सलग चार दिवस ड्रग्स देण्यात आले. एवढचं नाही तर दुसऱ्या देशात मला नेण्यात आले. हॉटेलमध्ये एका बंद खोलीत मला ठेवण्यात आलं होतं. यावेळी माझ्यावर बलात्कार देखील करण्यात आला.' अशा प्रकारे तिने घडलेल्या प्रसंगाचा उलगडा केला.

ती पुढे म्हणाली, काही वेळानंतर मी शुद्धीत येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका व्यक्तीने मला त्याच्या पाठून चालण्यास सांगितले. तेव्हा मी परिस्थिती लक्षात घेत त्याठिकाणाहून काढता पाय घेतला. शिवाय त्या व्यक्तीने त्याने केलेल्या पापाचा स्वीकार केल्याचा दावा गायिका डफीने केला आहे.

जगात महिलांवर होणाऱ्या आत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महिलांना स्वत:चं संरक्षण करण्यासाठी सक्षम झालचं पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात एक महिला पुरूषाच्या बरोबरीने काम करताना  दिसत आहे. तरी देखील तिला दुय्यम दर्जेची वागणूक दिली जाते. या अशा अनेक मुद्दांवर सतत चर्चा होत असते पण होत असलेल्या या घटना कधी थांबणार हे जास्त महत्तवाचं आहे.