पेंटिंग्ज विकल्या, उपाशी झोपला, कास्टिंग काउचचा सामना केला, या बॉलिवूड स्टाराला ओळखलं का?

टीव्ही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि बहुतेकदा महिला अभिनेत्रीच याला बळी ठरतात. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक पुरुष अभिनेता देखील आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचं शिकार व्हावं लागलं होतं

Updated: Sep 30, 2023, 06:38 PM IST
पेंटिंग्ज विकल्या, उपाशी झोपला, कास्टिंग काउचचा सामना केला, या बॉलिवूड स्टाराला ओळखलं का? title=

मुंबई : टीव्ही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल आणि बहुतेकदा महिला अभिनेत्रीच याला बळी ठरतात. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक पुरुष अभिनेता देखील आहे ज्याला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचं शिकार व्हावं लागलं होतं, मात्र तो त्यातून वाचला आणि त्याने स्वत: ला सुधारलं आणि आपल्या अभिनय कौशल्याचा जोरावर केवळ टीव्हीवरच नाही तर  मोठ्या स्क्रीनवरही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. केवळ सकारात्मक भूमिकेतच नाही तर हा अभिनेता नुकताच निगेटिव्ह भूमिकेतही दिसला आहे, तर हा फोटो पाहून हा अभिनेता कोण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या मागे आज लाखो मुली वेड्या आहेत.

हा फोटो नीट बघा, एका महिलेच्या मांडीवर एक गोंडस बाळ बसलं आहे. या मुलाची निरागसता पाहून हे मूल कोण असेल याचा अंदाज तुम्हाला येईल का? नसल्यास, आम्ही तुम्हाला एक हिंट देतो की, हा अभिनेता असण्याव्यतिरिक्त, तो एक होस्ट आणि गायक देखील आहे आणि त्याने टीव्हीपासून मोठ्या स्क्रीनवर आणि वेब सीरिजमध्ये देखील आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. तुमचा अजूनही काही गोंधळ असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे दुसरे तिसरे कोणी नसून टेलिव्हिजन सुपरस्टार राजीव खंडेलवाल आहेत, जे या चित्रात अतिशय निरागस आणि गोंडस दिसत आहेत.

राजीव खंडेलवाल याने 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यानच्या त्यांच्या संघर्षाची कहाणी शेअर केली होती. यादरम्यान त्याने सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे पैसे नव्हते आणि त्याला अनेकदा रिकाम्या पोटी झोपावं लागायचं. पेंटिंग विकून त्याने आपला उदरनिर्वाह चालवला. पण यादरम्यान त्याला एका गोष्टीचा सामना करावा लागला. ज्याचा त्याने कधी विचारही केला नव्हता, खरं तर राजीवने सांगितलं होतं की एका दिग्दर्शकाने त्याला एका चित्रपटात काम करण्याच्या बहाण्याने उघडपणे त्याच्यासोबत बेड ऑफर केला होता, ज्यामुळे तो खूप घाबरला होता आणि नंतर तो निघून गेला. चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि येथे बरेच यश मिळवले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

16 ऑक्टोबर 1975 रोजी जयपूर, राजस्थान येथे जन्मलेल्या राजीव खंडेलवाल यांची अभिनय कारकीर्द  खूपच अप्रतिम आहे. त्याने टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत काम केलं आहे. त्याने 2008 साली आमिर या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. याआधी 1998 मध्ये तो बनफूल या टीव्ही शोमध्ये दिसला होता. तथापि, राजीव खंडेलवाल यांना एकता कपूरच्या 'कहीं तो होगा' या शोमधून सर्वाधिक यश मिळालं, ज्यामध्ये त्यांनी सुजल ग्रेवालची भूमिका साकारली होती. राजीव खंडेलवाल अलीकडेच शाहिद कपूरच्या ब्लडी डॅडी या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने एक नकारात्मक भूमिका साकरली होती आणि त्याची भूमिका देखील खूप पसंत केली गेली होती.