VIDEO: आईचा हात पकडून चालताना वैतागली 12 वर्षांची आराध्या? कॅमेऱ्यात कैद

Aaradhya Bachchan Holds Aishwarya's Hand Video:  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात आराध्या बच्चन बैचेनी कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसते आहे. यावेळी आईचा हात पकडून एअरपोर्टवर स्पॉट झाल्यावर आराध्यावर नेटकरी टीका करताना दिसत आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 30, 2023, 06:34 PM IST
VIDEO: आईचा हात पकडून चालताना वैतागली 12 वर्षांची आराध्या? कॅमेऱ्यात कैद  title=
Aaradhya Bachchan Holds Aishwaryas Hand Video goes viral on instagram

Aaradhya Bachchan Holds Aishwarya's Hand Video: सोशल मीडियावर अनेकदा चर्चा असते ती म्हणजे आराध्या बच्चन हिची. तिचे व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अनेकदा सोशल मीडियावरून तिला ट्रोलही करण्यात येते. तिच्या हेअरस्टाईलची अनेकदा चर्चा रंगलेली असते. गेली अनेक वर्षे तिची हीच हेअरस्टाईल असल्याची टीका तिच्यावर होते.

ही एक टीका तर आहेच परंतु अनेकदा ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन या मायलेकी एअरपोर्टवर स्पॉट होतात. त्यावेळी ऐश्वर्या कायमच आराध्याचा हात पकडताना दिसते. त्यामुळे त्या दोघींवर अनेकदा टीकाकार टीका करताना दिसतात. आता असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी पुन्हा आराध्या आणि ऐश्वर्यावर निशाणा साधला आहे. 

आराध्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यातून काही दिवसांपुर्वीच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात तिचा हेअरकट बदललेला दिसतो आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा हा व्हिडीओ गणेश विसर्जनाचा आहे. त्यापुर्वी तिच्या शाळेतला तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तिचा लिपस्टिक लुक हा चांगलाच चर्चेत होता. तिचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता तिचा हाही व्हिडीओ जोरात चर्चेत आहे. यावर नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. चला तर मग पाहुया नेटकरी यावेळी काय बोलत आहेत. 

हेही वाचा : रात्री पोटभर जेवण झाल्यावर ताक पिताय? सावधान! होईल नुकसान

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी आराध्या आणि ऐश्वर्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावेळी त्या दोघी एअरपोर्टवर स्पॉट झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामागे पापाराझींची रांगच रांग लागली होती. त्या दोघींचे फोटो घेण्यासाठी फोटोग्राफर्स एकच गर्दी करत होते. तेवढ्यात आईचा हात पकडताना आराध्या इरिटेट होत होती असं वाटतं होते. त्यामुळे नेटकऱ्यांनीही नानाविध कमेंट्स केल्या होत्या. आराध्या एवढी 12 वर्षांची झाली तरीही आईचा हात का पकडते यामुळे सगळेच तिच्यावर टीका करत होते. यावेळी काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, ''आम्ही कधी पाहणार आराध्याचं कपाळ?'' तर एकानं म्हटलंय की, ''हे काय सारखं सारखं एकमेकींचा हात पकडता?'' तर तिसऱ्या एकानं म्हटलंय की, ''किती जूनी हेअरस्टाईल आहे.''