Tabassum Last Wish: निधनानंतर मुलाने पूर्ण केली तबस्सुम यांची शेवटची इच्छा

शनिवारी तबस्सूम यांच्या निधनाची (tabassum talkies) बातमी समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.   

Updated: Nov 20, 2022, 12:23 PM IST
Tabassum Last Wish: निधनानंतर मुलाने पूर्ण केली तबस्सुम यांची शेवटची इच्छा  title=

Tabassum Last Wish: गेल्या दोन वर्षात अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. ज्यामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. शनिवारी चाहत्यांच्या कानावर एक वाईट बातमी आली, ती म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम (Tabassum) यांच्या निधनाची. शनिवारी तबस्सूम यांच्या निधनाची (tabassum talkies) बातमी समोर येताच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 78 व्या वर्षी कार्डियक अरेस्ट आल्यामुळे तबस्सूम यांनी अखेरचा श्वास घेतला. (tabassum govil)

तबस्सूम यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा होशंग गोविल यांनी दिली. दरम्यान होशंग गोविल यांनी आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल देखील सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे तबस्सूम यांचा मुलगा होशंग गोविल यांनी आईची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे.

काय होती तबस्सूम यांची शेवटची इच्छा

मिळालेल्या माहितीनुसार, 'सर्दी आणि खोकल्यामुळे तबस्सूम यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेवटच्या श्वासानंतर किमान दोन दिवस तरी निधनाबद्दल कोणालाही माहिती देऊ नको...अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.' असं होशंग गोविल यांनी सांगितलं. 

तबस्सुम यांचं लग्न लोकप्रिय टीव्ही स्टार अरुण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्याशी झालं असून त्या असगरी बेगम आणि अयोध्यानाथ सचदेव यांच्या कन्या होत्या. तबस्सुम यांच्या निधनाने चाहत्यांसह बॉलिवूडला मोठं नुकसान झालं आहे. (son complete Last Wish of Tabassum)

1947 साली सिनेसृष्टीत पदार्पण 
तबस्सूम यांनी सुहाग, मंझधार, बडी बहन आणि दीदार यासारख्या चित्रपटात काम केलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं 'बचपन के दिन भूला ना देना' हे गाणं बेबी तबस्सूम यांच्यावरच चित्रीत करण्यात आलं होतं. बैजू बावरा या सिनेमात तबस्सूम यांनी मीना कुमारी यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. (tabassum career)

दिग्दर्शन आणि लेखक म्हणून कारकिर्द
1985 मध्ये तबस्सूम यांनी दिग्ददर्शक, निर्माती आणि लेखक म्हणून आपला पहिला सिनेमा प्रदर्शित केला. या सिनेमाचं नाव होतं 'तुम पर हम कुर्बान'. 2006 मध्ये त्यांनी पुन्हा टीव्ही कार्यक्रमात पुनरागमन केलं. तबस्सूम यांनी रामायण मालिकेतील अभिनेते अरुण गोविल यांचे मोठे भाऊ विजय गोविल यांची लग्न केलं. तबस्सूम यांना एक मुलगा असून त्यांचं नाव होशांग गोविल आहे.