सोनाक्षी-झहीरचे मेहंदी सेरेमनीतील फोटो समोर; शत्रुघ्न सिन्हांच्या लेकीच्या आनंदानं वेधलं लक्ष

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Mehendi Photo :  सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आले समोर...

दिक्षा पाटील | Updated: Jun 22, 2024, 10:26 AM IST
सोनाक्षी-झहीरचे मेहंदी सेरेमनीतील फोटो समोर; शत्रुघ्न सिन्हांच्या लेकीच्या आनंदानं वेधलं लक्ष title=
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal Mehendi Photo : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचं लग्न गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. झहीर इक्बालची बहीण सनम रतनसीनं सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. 

सनम रतनसीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये सोनाक्षी आणि झहीरच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आले आहेत. हे फोटो सोनाक्षी आणि झहीरच्या मेहंदी कार्यक्रमाचे आहेत. यात ते त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत दिसत आहे. असे अनेक फोटो त्यांच्या मित्रांनी शेअर केले आहेत. तर सोनाक्षी आणि झहीर यांचा स्टायलिश अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. फोटोत सोनाक्षीनं लाल रंगाचा गोल्डन वर्क असलेला कुर्ता-शरार परिधान केला आहे. तर तिचा मेकअप देखील लाइट आहे. तर दुसरीकडे झहीरच्या लूकविषयी बोलायचे झाले तर त्यानं लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि पजामा परिधान केला आहे. 

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal mehendi function photo s viral

शत्रुघ्न सिन्हा यांनी टाइम्स नाउला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की 23 जून रोजी लग्न नाही. रिसेप्शन आहे. ज्यात आम्ही सहभागी असू. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा तारिख स्पष्ट केली आणि म्हटलं की माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं लग्नाविषयी काही वक्तव्य केलं नाही. काही मीडिया आउटलेट्स या सगळ्याचा अंदाज लावत आहेत. जी गोष्ट कुटुंबातील खासगी आहे त्या गोष्टीवर सगळ्यात जास्त लक्ष देण्यात येत आहे. 

शत्रुघ्न सिन्हा यांचे जवळ मित्र शशि रंजन यांनी 'ई-टाइम्स' ला दिलेल्या मुलाखतीत लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे. तिच्या लग्नासाठी सगळेच आतुर आहेत. सगळ्यांचे आशीर्वाद त्या दोघांसोबत आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचं रजिस्टर मॅरेज असेल. झहीर इक्बालच्या घरी हे रजिस्टर लग्न होईल. तिथे फक्त कुटुंब त्यांचं कुटुंब उपस्थित असेल. 

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा होणाऱ्या पतीपेक्षा 'इतक्या' कोटींनी श्रीमंत!

दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर लग्न बंधनात अडकण्याआधी त्यांच्या लग्नाची काही दिवसांपासून तयारी सुरु झाली. एकीकडे शत्रुघ्न सिन्हा यांचं 8 मजली 'रामायण' हे घर सजवण्यात आलं आहे तर दुसरीकडे त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांची तयारी सुरु झाली आहे.