सोनम कपूर आणि आनंद अहुजा बोहल्यावर चढायला सज्ज !

बॉलिवूडमधील अजून एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Updated: Feb 2, 2018, 03:44 PM IST
सोनम कपूर आणि आनंद अहुजा बोहल्यावर चढायला सज्ज !  title=

मुंबई : बॉलिवूडमधील अजून एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सोनम कपूर बिझनेसमॅन आनंद अहुजासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जून महिन्यात अडकणार लग्नबंधनात  

मीडिया रिपोर्ट्स पाहता सोनम आणि आनंद जून महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. काही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हे दोघे साखरपुडा करणार आहेत. रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडीने अनेकदा त्यांचे फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत.  

डेस्टिनेशन वेडिंग 

सोनम आणि आनंददेखिल डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लान करत आहेत. हे लग्न पूर्णपणे पंजाबी स्टाईलने होण्याची शक्यता आहे. हे लग्न दिल्ली किंवा उदयपूरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या सेलिब्रिटींमध्येही वेडिंग डेस्टिनेशन करण्याचा ट्रेंड आहे. 

आनंदचे कपूर परिवारासोबत उत्तम बॉन्डिंग  

सोनम कपूरचा भाऊ हर्षवर्धन कपूर आणि आनंद यांचीदेखील एकमेकांसोबत उत्तम बॉन्डिंग आहे. अनेकदा ते पार्टीमध्ये एकत्र दिसले आहेत. कपुर कुटुंबियांसोबत आनंददेखील अनेकदा दिसला आहे. 

जूनमध्ये येणार 'वीरे दी वेडिंग' 

जून महिन्यात सोनमचा 'वीरे दी वेडिंग' हा सिनेमादेखील येणार आहे. यामध्ये सोनम सोबत करिना कपूर, स्वरा भास्कर झळकणार आहे. 

आनंद आहुजा बिझनेसमॅन  

सोनम कपूर ही अभिनेत्री आहे. तिचे कुटुंबीयही बॉलिवूडमध्ये आहे. मात्र आनंद हा बॉलिवूड किंवा सिनेक्षेत्राशी निगडीत नाही. आनंद अहुजा हा दिल्लीतील एका शूज ब्रॅन्डचा मालक आहे. दोघांची करियर वेगवेगळी असली तरीही अनेक ठिकाणी त्यांची पसंत जुळते. 

सोनम आणि आनंद दोघेही फीटनेस फ्रीक आहेत, बास्केटबॉल खेळाचे ते शौकीन आहेत. काही दिवसांपूर्वी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडला स्पोर्ट्स बाईक बीएमएक्स गिफ्ट दिली होती.