व्हिडिओ : सोशल मीडियावर 'ज्युनिअर' सपना चौधरीचा धुमाकूळ

नुकत्याच बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली हरियाणाची स्टेज परफॉर्मर सपना चौधरी चांगलीच प्रसिद्ध झालीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 2, 2018, 01:26 PM IST
व्हिडिओ : सोशल मीडियावर 'ज्युनिअर' सपना चौधरीचा धुमाकूळ

मुंबई : नुकत्याच बिग बॉस सिझन ११ मध्ये दिसलेली हरियाणाची स्टेज परफॉर्मर सपना चौधरी चांगलीच प्रसिद्ध झालीय. 

Add Zee News as a Preferred Source

हरियाणामध्ये सपनाच्या डान्सचं चांगलंच कौतुक होतं... पण, सोशल मीडियावर सध्या सपना सोबत 'ज्युनिअर' सपनाचाही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो. 

ही चिमुरडी कोण आहे? ती कुठे राहते? हे मात्र या व्हिडिओतून समोर येत नाही. मात्र या चिमुरडीचा डान्स मात्र भल्याभल्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. जवळपास पाच वर्षांची ही चिमुरडी एका हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसतेय... इतकंच नाही तर तिच्या जवळपास उपस्थित असणारे तिला पैसे आणि चॉकलेट देऊन तिचं कौतुक करत आहेत. 

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या चिमुरडीचं कौतुक करावं की परिस्थितीवर चिडावं? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो... परिस्थितीनं साथ न दिल्यानं आत्तापर्यंत सपना चौधरीही टॅलेंट असूनही पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर होती... बिग बॉसमुळे चर्चेत आल्यानंतर आता सपना सिनेमांतही झळकणार आहे. सपना लवकरच बॉलिवूड अभिनेता अभय देओलसोबत एका सिनेमात दिसणार आहे. तर भोजपुरी सिनेसृष्टीतही ती लवकरच पदार्पण करतेय. 'बैरी पिया २'मध्ये ती एक आयटम डान्स करताना दिसणार आहे. 

About the Author