Sonam Kapoor झाली रोमॅन्टिक, सगळ्यांसमोर पतीला केलं kiss

माझ्या प्रेमाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

Updated: Jan 2, 2022, 06:22 PM IST
 Sonam Kapoor झाली रोमॅन्टिक, सगळ्यांसमोर पतीला केलं kiss  title=

मुंबई : नवीन वर्ष 2022 ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन फिके पडले असले तरी लोक आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करत आहेत.

यात सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत, तेही नव्या वर्षाची सुरुवात खास पद्धतीने करत आहेत. दरम्यान, बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत लिपलॉक करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.

खरंतर, सोनम कपूरने 2022 मधील तिची पहिली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोनमने पती आनंद आहुजासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे दोन्ही बॉलिवूड कपल्स ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहेत.

तर पहिल्या फोटोमध्ये सोनम कपूर पती आनंदला किस करताना दिसत आहे, दुसऱ्या फोटोत सोनम कपूर आणि आनंद आहुजा लिपलॉक करताना दिसत आहेत.यासोबतच सोनमने न्यू इयर सेलिब्रेशनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे फोटो शेअर करत सोनम कपूरने एक अतिशय सुंदर पोस्टही लिहिली आहे. सोनमने लिहिले आहे - माझ्या प्रेमाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तू ती व्यक्ती आहेस जिच्यासोबत मला दरवर्षी नवीन वर्ष साजरे करायचे आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

2022 मध्ये तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा. सोनम कपूरने पतीसोबत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. सोनम आणि आनंदचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. यामुळेच काही वेळापूर्वी शेअर केलेल्या या फोटोंवर लाखो व्ह्यूज आणि लाईक्स आले आहेत. फोटो पाहून सोनमचे चाहतेही तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.