सोनम कपूरला जेव्हा या अचानक लाजीरवण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं

कधीकधी अभिनेत्री फॅशनच्या नादात Oops Moment च्या बळी ठरतात. 

Updated: Oct 25, 2021, 10:07 PM IST
सोनम कपूरला जेव्हा या अचानक लाजीरवण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं

मुंबई : बॉलीवूडच्या नायिका सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारचे कपडे परिधान करतात, मात्र कधीकधी अभिनेत्री या कपड्यांमुळे Oops Moment च्या बळी ठरतात. नेटकरी त्यांचे हे व्हिडिओ पाहताच ते व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा अनेक वेळा Oops Moment ची शिकार बनली आहे. सोनम कपूरला तिच्या फॅशन सेन्समुळे स्टायलिश क्वीन म्हटलं जातं. पण स्टाईलच्या बाबतीत, सोनम देखील Oops Moment ची शिकार झाली आहे.

सोनम कपूरसोबत झालं वार्डरोब मालफंक्शन
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोनम कपूर रोज तिच्या पोशाखांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असते. एका कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने काळी आणि पांढरी साडी घातली होती. ज्याचा ब्लाऊज शर्टसोबत जोडला होता. संपूर्ण कार्यक्रमात अभिनेत्री तिच्या या पकड्यांत कंम्फर्टेबल नव्हती. ती भाषण देण्यासाठी उभी राहते आणि साडीत अडकून पडू लागते. यावेळी तिथे उपस्थित लोकं तिला सावरतात.

कार्यक्रमात सोनमला Oops मोमेंटचा शिकार व्हावं लागलं
दरम्यान, सोनम कपूरच्या शर्टची बटणंही ओपन होतात आणि ती Oops Moment ची शिकार बनते. अभिनेत्री हा क्षण कसा-बसा हातळते आणि पुढे जाते. व्हिडिओमध्ये ती व्यासपीठावर उभी राहून तिच्या शर्टची बटणं लावताना दिसत आहे.  ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि इच्छा नसतानाही, अभिनेत्री Oops Moment ची शिकार झाली. संपूर्ण व्हिडिओमध्ये अभिनेत्री पुन्हा पुन्हा तिचा शर्ट व्यवस्थित करताना दिसत आहे.

सोनमच्या कॉन्फिडंसला तोड नाही
सोनम कपूरच्या कॉन्फिडंसला तोड नाही. या Oops Moment ही तिच्या चेहऱ्यावर हावभावदेखील बदलले नाहीत आणि तिने स्वतःला उत्तम स्टाईलने हाताळलं. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर एक स्मितही सतत दिसत होतं. इतकंच नव्हे तर कॅमेऱ्याला न घाबरता अभिनेत्रीने सर्वांसमोर आपला ड्रेस व्यवस्थित केला.