Sonam Kapoor Earings: सोनम कपूर ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही तिचे तीन कोटीहून अधिक फॉलोवर्स आहेत. आपले हटके आणि स्टायलिश फोटो ती सोशल मीडियावर अनेकदा शेअर करताना दिसते आणि तिच्या या फोटोंना चाहत्यांचा तूफान प्रतिसाद येताना दिसतो. त्यातून तिला बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन असंही म्हटलं जातं. तिच्यावर हरएक लुक हा उठून दिसतो. अनेक अभिनेत्री तिची फॅशन स्टाईल ही फॉलो करताना दिसतात. त्यामुळे तरूणींसोबत सेलिब्रेटींमध्येही तिची जोरात चर्चा रंगताना दिसते. पारंपारिक असो वा मॉडर्न किंवा इतरत्र कुठली फॅशन. तिच्यावर अनके फॅशनचे प्रयोगही सूट होतात. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेव्हलवर होणाऱ्या फॅशन शोजना ती भेट देते. लंडन असो वा पॅरिस, अशा अनेक फॅशन शोमध्ये तिची हजेरी असते. त्यामुळे तिची जोरात चर्चा असते. सध्या तिनं बिझनेस ऑफ फॅशनच्या गाला भेट दिली आहे.
यावेळी तिच्या आऊटफिटवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत. त्यातून तिच्या लोंबत्या, छातीपर्यंत आलेल्या कानांतल्यांचीही प्रचंड चर्चा रंगलेली आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की नक्की या कानातल्याची किंमत असेल तरी किती आणि त्यातून या लोंबत्या कानातल्यांमुळे सोनमला वेदना होतात की नाही? आपण अनेकवर्ष पाहत आलो आहोत की टिव्ही सिरियल्समध्ये अभिनेत्रींच्या आणि खलनायिकांच्या मोठ्या आणि लोबंत कानातल्याची चर्चा असते. परंतु त्यांच्यापेक्षाही मोठ्या कानातल्यांना तेही चांगले हिऱ्यामोत्यांचे, सोनमनं भलतंच डेरिंग दाखवलं आहे. त्यामुळे तिची काहीच्या काहीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या या लोबंत्या कानातल्यांकडे पाहत चाहत्यांची तर नजरच हटत नाहीये.
हेही वाचा : Animal मधील बॉबी देओलच्या लुकवर भाऊ सनी देओलची एका शब्दातच प्रतिक्रिया?
Business of Fashion 500 Gala येथे सध्या सोनम कपूरनं हजेरी लावली आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपासून ती पॅरिसमध्ये आहे. आपल्या स्टोरीजही ती पोस्ट करताना दिसते आहे. आता तिनं परिधान केलेल्या आऊटफिटची सर्वत्र चर्चा आहे. चला तर मग पाहुया यावेळी तिचा फॅशन स्टाईल स्टेटमेंट नक्की आहे तरी काय?
व्हॅलनटीनो या ब्रॅण्डचा ड्रेस तिनं परिधान केला आहे. यावेळी हा ड्रेस खूपच रॉयल आणि आकर्षक वाटतो आहे. ओव्हरसाईज्ड कानातल्यांनी तिला लुक हा पुर्ण केला आहे. त्यामुळे तिच्या हा लुक सर्वत्र व्हायरल होतो आहे. त्यातून सध्या तिच्या या लोंबत्या लांब कानातल्यांची जोरात चर्चा आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.