सोनम कपूरच्या लग्न तयारीच्या उत्साहात संजय कपूरचा रस्त्यावर भांगडा

सोनम कपूरच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. 8 मे  रोजी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे. बॉलिवूडसह कपूर कुटुंबीय सोनमच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. 

Updated: May 5, 2018, 06:07 PM IST
सोनम कपूरच्या लग्न तयारीच्या उत्साहात संजय कपूरचा रस्त्यावर भांगडा

मुंबई : सोनम कपूरच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. 8 मे  रोजी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद अहुजासोबत विवाहबद्ध होणार आहे. बॉलिवूडसह कपूर कुटुंबीय सोनमच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. 

संजय कपूरचा भांगडा 

सोनमच्या लग्नामुळे कपूर कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. संजय कपूर या आनंदाच्या भरात रस्त्यात भांगडा करतानाचा खास व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्नी महीपसोबत संजय कपूर अनिल कपूरच्या घराजवळ उतरले तेव्हा मीडिया प्रतिनिधींनी त्यांचे फोटो क्लिक केले. अशावेळेस मीडिया समोर भर  रस्त्यामध्ये संजय कपूर नाचताना दिसले. 

 

 

Welcome to #sonamkishaadi #sanjaykapoor #mahendrakapoor 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 कलाकार सेलिब्रेशनमध्ये सहभागी 

लग्नाआधी अनिल कपूरच्या घरी सोनमच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याची तयारी सुरू आहे. याकरिता कपूर कुटुंबीयांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही हजर आहेत. 8 मेला मुंबईत सोनम आणि आनंद अहुजा विवाहबद्ध होणार आहेत.