याच गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप

कलाविश्वात कोणीच साथ दिली नसल्याची खंतही तिने व्यक्त केली होती.

Updated: Sep 30, 2018, 07:48 PM IST
याच गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी असभ्य वर्तन केल्याचा तनुश्रीचा आरोप  title=

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून ज्या कारणामुळे चर्चेत आहे, त्याच कारणाशी संबंधीत अतिशय महत्त्वाची अशी माहिती किंबहुना व्हिडिओ ता सर्वांसमोर आला आहे. ज्या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केलं होतं, असा आरोप तनुश्रीने केला होता त्याच गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

‘नथनी उतार’ असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये आयटम गर्ल राखी सावंत झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे. तनुश्रीसोबतच्या त्या प्रसंगानंतर राखीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं.

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिने त्यांच्यावर एका मुलाखतीदरम्यान केला.

स्क्रिप्टमध्ये नसणारी दृश्यसुद्धा निर्मात्यांच्या आणि नानांच्या सांगण्यावरुन या गाण्यात सांगितली गेली. या दृश्यांसाठी आपण नकार दिला तेव्हा राजकीय पक्षातील मंडळींना बोलवून नानांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपही तिने केला होता.

जवळपास दहा वर्षांनंतर तनुश्रीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला. आपल्याला त्यावेळी कलाविश्वात कोणीच साथ दिली नसल्याची खंतही तिने व्यक्त केली होती.