सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीचं दुसरं लग्न

कुणाशी करतेय दुसरं लग्न 

सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीचं दुसरं लग्न

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांची छोटी मुलगी सौंदर्या दुसरं लग्न करणार आहे. पुढल्यावर्षी जानेवारीत अभिनेता - बिझनेसमॅन विशगन वनांगामुडीसोबत सात फेरे घेणार आहेत. रिपोर्टनुसार, दोघांनी एका खाजगी पद्धतीने साखरपुडा केला आहे. गेल्यावर्षी सौंदर्याने पहिला नवरा अश्विन रामकुमारसोबत घटस्फोट घेतला आहे. 

रिपोर्टनुसार, 35 वर्षांच्या विशागनचं देखील दुसरं लग्न आहे. या अगोदर त्याने एक मॅगझिन एडिटर कनिखा कुमारनसोबत लग्न केलं होतं. हे नातं मात्र जास्त दिवस टिकलं नाही. त्यानंतर कनिखा प्रोड्यूसर वरूण मनियनची पत्नी आहे. विशागन एका औषध कंपनीची मालकिण आहे. तर तिचा भाऊ एसएस पोनमुडी तामिळनाडूमधील लोकप्रिय पॉलिटिकल पार्टी डीएमकेची नेता आहे. 

सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच गेल्यावर्षी घटस्फोट झाला आहे. रजनीकांत यांच्या मुलीने 2016 मध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर तिने घटस्फोटाची मागणी केली आणि 2017 मध्ये सहमतीने घटस्फोट झाला. या दोघांना वेद नावाचा एक मुलगा देखील आहे.