Suriya Fans Dies: सूर्याच्या बर्थडेला गालबोट! फॅन्स बॅनर लावायला गेले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Suriya Fans Dies due to electric shock: आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त (South Actor suriya Birthday)  मोठे फ्लेक्स बॅनर लावताना दोन चाहत्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने दोन्ही चाहत्यांचा मृत्यू झालाय.

Updated: Jul 24, 2023, 06:22 PM IST
Suriya Fans Dies: सूर्याच्या बर्थडेला गालबोट! फॅन्स बॅनर लावायला गेले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं title=
suriya fans death

South Actor suriya Fans Dies: तमिळ चित्रपटातील सुपरस्टार अभिनेता सूर्या (Suriya) याने 48 वा वाढदिवस साजरा केला. रविवार 23 जुलै रोजी सूर्याचा वाढदिवस (South Actor suriya Birthday) होता. या खास सोहळ्यासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र, त्याच्या बर्थडेला धक्कादायक घटना घडल्याचं पहायला मिळतंय. आंध्र प्रदेशमधून ही वेदनादायक माहिती समोर आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त मोठे फ्लेक्स बॅनर लावताना दोन चाहत्यांचा मृत्यू (Suriya Fans Dies) झाल्याची घटना घडली आहे. विजेच्या धक्क्याने दोन्ही चाहत्यांचा मृत्यू झालाय. (Latest Marathi News)

नेमकं काय झालं?

एन व्यंकटेश आणि पी साई हे दोन विद्यार्थी नरसरावपेट शहरातील एका खाजगी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत होते. शनिवारी या दोघांनी त्यांच्या आवडत्या अभिनेता सूर्यासाठी बॅनर लावण्याचं ठरवलं. फ्लेक्स बनवण्यासाठी टाकला. शनिवारी वाजत गाजत फलेक्स आणला. मात्र, ज्या लोखंडी रॉडवर फ्लेक्स लावला होता तो ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने दोन्ही चाहत्यांना जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बहिणीचा खळबळजनक आरोप

पी साईची बहीण अनन्याने तिच्या भावाच्या मृत्यूसाठी कॉलेज प्रशासनाला जबाबदार धरले. माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज जबाबदार आहे, असं अनन्या म्हणाली. महाविद्यालय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि देखरेख करत नाही, असा आरोप तिने केलाय. त्यामुळे आता पोलीस देखील कसून चौकशी करत असल्याचं दिसत आहे. 

कांगुवा  चित्रपटाची पहिली झलक

दरम्यान, रविवारी सुर्याच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या आगामी 'कांगुवा' या चित्रपटाची पहिली झलकही दाखवण्यात आलीये. हा एक पीरियड ड्रामा चित्रपट असून ज्याची पहिली झलक पाहून चाहत्यांना सोशल मीडियावर वेड लागलंय. त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची वाट पाहत आहेत. सूर्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'विक्रम वेध', 'जय भीम', 'सिंघम', 'रक्त चरित्र' अशा अनेक सिनेमांमध्ये त्याने दमदार अभिनय दाखवला आहे. तमिळ इंडस्ट्रीच्या या सुपरस्टारने आपल्या अभिनय कौशल्याने लाखो मने जिंकली आहेत.