Viral Video of Soan Papdi: दिवाळी सणात एक मिठाई कायमची चर्चेत असते ती म्हणजे सोनपापडी. अनेक कार्यालयांमध्ये तर बोनसच्या नावाखाली सोनपापडी दिली जाते. तर काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून हातात सोनपापडीता पुडा सोपवला जातो. यानंतर आपला सोनपापडीचा पुडा कोणाला खपवायचा यासाठी प्रयत्न सुरु होता. पण असेही अनेकजण आहेत ज्यांना सोनपापडी खाण्यास फार आवडते. पण ही सोनपापडी नेमकी कशी बनवतात हे कधी तुम्ही पाहिलं आहे का? नसेल तर मग एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला ही संधी आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच सोनपापडी खाणार नाही.
व्हायरल व्हिडीओत सोनपापडी बनवताना स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली नसल्याचं दिसत आहे. एखाद्या उघड्या शेडखाली ही सोनपापडी तयार केली जात आहे. या व्हिडीओने लाखो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
व्हिडीओच्या सुरुवातीला सोन पापडीच्या पिठाचा एक मोठा गोळा दिसतो. त्यानंतर एक पुरुष त्यातील काही भाग बाहेर घेऊन जातो. यादरम्यान तिथे विटा लावलेल्या भिंतीचा त्यासाठी वापर केला जोत. गॅसवर पुढील प्रक्रिया करण्यापूर्वी तो एका शीटवर त्याला सपाट करतो. कच्च्या सोनपापडीचे साहित्य गरम करून ते तेल किंवा तुपात मिश्रीत केल्यानंतर एका भिंतीला आपटलं गेलं. चमकदार पोत येईपर्यंत ते मळलं जातं. नंतर काही कामगार सोनपापडी तया करण्यासाठी मऊ आणि लांब धाग्यांमध्ये रुपांतरित होईपर्यंत खेचतात. दरम्यान सोनपापडी तयार केली जात असताना ती सपाट करण्यासाठी त्यावर कर्मचारी चपला घालूनच चढले होते.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यानंतर अनेकजण त्यावर व्यक्त झाले असून ही फार अस्वच्छ प्रक्रिया असल्याचं म्हटलं आहे. एकाने कमेंट केली आहे की, या देशात स्वच्छता ठेवणं हे बेकायदेशीर झालं आहे.
एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, "मी सोनपापडीचा संपूर्ण बॉक्स खाल्ला आहे, आता उलटी कशी करायची?". तर एकाने भारताने आता रस्त्यावरील अन्नावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली आहे. अनेकांचं पोट त्यावर आहे हे मान्य आहे, पण स्वच्छताही पाळायला हवी. एका युजरने मी आता या देशाला अजिबात समर्थन देऊ शकत नाही असं म्हटलं आहे. तर एकाने आपण ज्याप्रकारे मिठाई एकमेकांच्या घरी पाठवत असतो त्याचप्रमाणे स्वच्छतेचं झालं आहे असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे.
QAT
(17.4 ov) 101
|
VS |
SDA
100/7(20 ov)
|
Qatar beat Saudi Arabia by 1 run | ||
Full Scorecard → |
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.