म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास

गेल्या वर्षी बॉलिवूडचा लोकप्रिय प्लेबॅक सिंगर KK चे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये निधन झाले होते. आता असाच प्रकार आणखी एक लोकप्रिय गायकासोबत झाला आहे. त्यानं देखील लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, अखेरचा श्वास घेतला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Mar 12, 2023, 02:45 PM IST
म्युझिक फेस्टिव्हलमध्ये लाइव्ह परफॉर्म करताना 'या' गायकानं स्टेजवरच घेतला अखेरचा श्वास title=

Costa Titch Death: बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर हळू हळू काही गोष्ट समोर येऊ लागल्या होत्या. दरम्यान, आता आणखी एका हॉलिवूड कलाकाराचे निधन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय रॅपर आणि आर्टिस्ट कोस्टा टिचचे निधन झाले आहे. कोस्टा टिचचे (Costa Titch) काल शनिवारी म्हणजे 11 मार्च रोजी जोहान्सबर्गमधील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करत असताना अचानक निधन झाले. त्याला अचानक स्टेजवर चक्कर आली आणि तो स्टेजवरून खाली पडला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

कोस्टा टिचच्या शोसाठी लाखोच्या लोकांनी हजेरी लावली होती. अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हमध्ये तर त्याच्यासाठी हजारोच्या संख्येनं हजेरी लावली होती. यावेळी कोस्टा त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एक नाही तर एकामागे एक गाणी गात रॅप करत होता. तो पूर्ण एनर्जीनं गाणी गात होता. त्याला पुढे काय होणार याची कल्पना कोस्टाला काय तर कोणालाही नव्हती. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात कोस्टा स्टेजवर दोनवेळा पडताना दिसत आहे. जेव्हा पहिल्यांदा कोस्टाला चक्कर सारखं वाटलं तेव्हा त्यानं स्टेजवर असलेल्या त्याच्या मित्राचा आधार घेत तोल सांभाळतो. त्यानंतर तो दुसऱ्यांदा जेव्हा पडला तेव्हा त्याला उठता आले नाही आणि तो स्टेजच्या खाली पडला. 

कोण होता कोस्टा टिच?

कोस्टा टिचचं खरं नाव Costa Tsobanoglou होते. नेलस्प्रुट येथे 1995 साली कोस्टाचा जन्म झाला होता. कोस्टाला त्याच्या 'एक्टिवेट' आणि Nkalakatha या दोन हिट गाण्यांसाठ लोक ओळखतात. कोस्टाचं अचानक निधन झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. सोशल मीडियावर त्याच्या आत्माला शांती भेटो अशा पोस्ट त्याचे चाहते ते दाक्षिण आफ्रिकेतील लोक पोस्ट शेअर करत आहेत. 

हेही वाचा : PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

गेल्या वर्षी असाच प्रकार बॉलिवूडचा प्लेबॅक सिंगर KK सोबतही झाले होते. गेल्या वर्षी म्हणजेच मे 2022 मध्ये केकेचा कोलकातामध्ये एक शो सुरु होता. त्यावेळी कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. केकेचे संपूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नथ होते. पण त्याला छोटं करत त्यानं स्टेजनेम KK असे केले होते.