PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा

Kapil Sharma चा द कपिल शर्मा शो हा लोकप्रिय आहे. फक्त भारतात नाही तर परदेशातही लोक त्याचा हा शो पाहतात. कपिल शर्माच्या शोमध्ये सेलिब्रिटींपासून सगळेच हजेरी लावतात. दरम्यान, आता त्याच्या शोमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत का? या विषयी कपिलनं खुलासा केला आहे. 

Updated: Mar 12, 2023, 01:32 PM IST
PM Modi लावणार 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी? Kapil Sharma नं केला खुलासा title=

PM Modi In Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडियन 'कपिल शर्मा' (Kapil Sharma) हा त्याच्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) शोमुळे नेहमीच चर्चेत राहतो. त्याचा या कॉमेडी शोचे लाखो चाहते आहेत. कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीज हे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेथे येतात. फक्त कलाकारच नाही तर बिझनेसमॅनपासून इन्फ्लुएन्सर्सपर्यत अनेक लोक तिथे उपस्थित राहतात. आता कपिलनं खुलासा आहे की त्याच्या शोमध्ये भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आमंत्रन दिलं आहे. याविषयी त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

कपिलनं नुकतीच आजतकला एक मुलाखत दिली होती. यावेळी कपिल शर्मानं खुलासा केला की जर त्याच्या शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तर त्याला खूप आनंद होईल. याविषयी बोलताना कपिल म्हणाला, 'मी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटलो होतो, तेव्हा त्यांना कपिल शर्मा शोमध्ये येण्याची विनंती केली होती. मोदींनी माझ्या शोमध्ये येण्यास नकार दिला नाही. सध्या तरी विरोधकांकडून माझ्याबाबत खूप विनोदी गोष्टी बोलल्या जात आहेत. कधीतरी तुझ्या शोमध्ये येऊ, असं मोदी म्हणाले होते.' या प्रकारे त्यांनी नकार दिला नाही, जर ते आले तर आम्हाला खूप जास्त आनंद होईल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विनोदी बाजू ही सगळ्या प्रेक्षकांना दाखवायची आहे. याविषयी सांगताना कपिल म्हणाला, मुंबईत जेव्हा फिल्म म्यूजियमचे उद्घाटन करण्यात आले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी खूप चांगले विनोद केले होते. संपूर्ण चित्रपटसृष्टीतील लोक त्यावेळी तिथे उपस्थित होते. तर माझी इच्छा आहे की जे आम्ही पाहिलं ते संपूर्ण जगानं पहावं. मी तर त्यांना नेहमीच बोलवत राहिन. 

हेही वाचा : भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोळ्या महिलेचे कोल्हापुरशी खास कनेक्शन!

दरम्यान, लवकरच कपिल ‘ज्विगाटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 17 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या कपिल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या आधी कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करूं' आणि 'फिरंगी' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नाही.